IND vs AUS Final : भारत की ऑस्ट्रेलिया... 2023 चा विश्वचषक (World Cup 2023) कोण जिंकणार? सध्या जिकडे तिकडे याचीच चर्चा सुरु आहे. भारतीय संघ यंदाचा विश्वचषक उंचावणार की नाही... याबाबत चर्चा सुरु आहे.
भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर.. संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघावर भारी पडलाय. टीम इंडियापुढे प्रत्येकाने हार मानली. भारताने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. ऑस्ट्रेलियाच्या संघानेही सलग आठ सामने जिंकत फायनलचे तिकीट मिळवलेय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर त्यांनी जोरदार कमबॅक केले. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
ज्योतिषनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा फायनलचा सामना रंगतदार होणार आहे. भारतीय संघाला वेगवान सुरुवात मिळेल, पण त्यानंतर लागोपाठ विकेट पडण्याची शक्यता आहे. तसेच कठीण परिस्थितीत विराट कोहलीच्या शतकाचाही योग बनला आहे. विराट कोहली फायनलमध्ये शतक ठोकत नवा किर्तीमान स्थापन करणार आहे. विराट कोहली शतक ठोकत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो. पण महामुकाबल्यात गोलंदाजाची भूमिका सर्वात महत्वाची राहणार आहे. विशेषकरुन फिरकी गोलंदाजाची भूमिका अधिक महत्वाची ठरणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. जर पावसाने खोडा घातला तर भारताच्या विजयाची शक्यता अधिक आहे. रविवारी भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्याचा योग जुळून आलाय.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स मुख्य भूमिका बजावू शकतात. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल वेगाने सुरुवात देतील. त्याशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचे योगदानही महत्वाचे ठरेल. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीही मुख्य भूमिका पार पाडू शकतात.
ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघ विश्वचषक उंचावण्याचा योग आहे. त्यामुळे रविवारी होणारा महामुकाबला जिंकून भारत तिसऱ्यांदा जगज्जेता होऊ शकतो.
सामना पाहण्यासाठी लाखभर चाहते येणार -
अहमदाबाद स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी जवळपास लाखभर चाहते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्टेडियम आणि शहरात मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. अहमदाबाद स्टेडियममध्ये एक लाख 32 हराज प्रेक्षकांची क्षमता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार आहे.