IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानात खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो. 






खेळपट्टी पाहता भारताचा फलंदाजीचा निर्णय


सामना होणाऱ्या इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. ही खेळपट्टी उच्च धावसंख्येसाठी ओळखली जाते. वेगवान गोलंदाजांना विशेष मदत मिळताना दिसलेलं नाही. दरम्यान मैदानाच्या सीमा जवळ आहेत, त्यामुळे याठिकाणी फलंदाजांना खास मदत होते. कसोटी सामन्याच्या बाबतीत, या मैदानावर आतापर्यंत एकूण दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एका डावात 557/5 (डाव घोषित) अशी उच्च धावसंख्या झाली आहे. त्याच वेळी, मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या 150 धावांची आहे. प्रथम फलंदाजी करताना, खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहते, परंतु सामना पुढे-पुढे जातो तशी ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी बनते. येथे पहिल्या डावात 353, दुसऱ्या डावात 396, तिसऱ्या डावात 214 आणि चौथ्या डावात 153 अशी सरासरी धावसंख्या आहे. दरम्यान फलंदाजीसाठी मैदान उपयुक्त असल्याने एक मोठी धावसंख्या करण्याच्या हेतूने भारताने प्रथम फलंदाजी निवडली असावी.


भारतीय संघात दोन बदल


याशिवाय भारतीय संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारत दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) सतत फ्लॉप कामगिरी करत असल्याने त्याला वगळत मर्यादित षटकांच्या सामन्यात तुफान फॉर्म दाखवलेल्या शुभमन गिलला (Shubhman Gill) सलामीची संधी दिली आहे. तसंच मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादव अंतिम 11 मध्ये आहे. 


भारताची प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.


हे देखील वाचा-