India vs Australia 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना होबार्टमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि 20 षटकांत 6 गडी गमावून 186 धावा फलकावर लावल्या. त्यामुळे भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं.
टिम डेव्हिड अन् मार्कस स्टोइनिसची वादळी खेळी
ऑस्ट्रेलियासाठी टिम डेव्हिडनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं केवळ 38 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 74 धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याचप्रमाणे मार्कस स्टोइनिसनंही जबरदस्त फलंदाजी करत 39 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावा फटकावल्या. या दोघांच्या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने मजबूत धावसंख्या उभी केली.
अर्शदीप सिंग एकटा पडला, बुमराह अन् दुबेला धू-धू-धुतला
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला काही झटपट विकेट्स घेत चांगली सुरुवात केली होती. मात्र, टिम डेव्हिड आणि स्टोइनिससमोर त्यांना नंतर काही करता आलं नाही. शेवटच्या षटकांत गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. अर्शदीप सिंगनं भारतासाठी सर्वाधिक3 बळी घेतले, तर वरुण चक्रवर्तीच्या नावावर 2 विकेट्स नोंदल्या गेल्या. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहची चांगलीच धुलाई करण्यात आली. एकूणच, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनं भारतासमोर आव्हानात्मक 187 धावांचं लक्ष्य ठेवत सामना रंगतदार बनवला आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11 : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मॅट कुह्नेमन.
हे ही वाचा -