IND vs AUS 3rd T20 LIVE Score | भारत-ऑस्ट्रेलियात तिसरा टी20 सामना
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20 मालिका आपल्या नावे केली.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Dec 2020 04:40 PM
पार्श्वभूमी
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20...More
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20 मालिका आपल्या नावे केली. आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एक बदल होऊ शकतो तर ऑस्ट्रेलियन संघात देखील एक बदल होण्याची शक्यता आहे. टी20 मालिकेतील पहिल्या दोन विजयासह मालिका जिंकलेला विराट कोहलीचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल तर ऑस्ट्रेलिया संघासाठी हा विजय मिळवण्याचे आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये अॅलेक्स कॅरीची एन्ट्री? दोन सामने गमावल्यानंतर आता तिसऱ्या टी20 मध्ये विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स कॅरीची टीममध्ये एन्ट्री होऊ शकते. तर नियमित कर्णधार अरॉन फिंचची देखील वापसी होण्याची शक्यता आहे. जर फिंच संघात आला तर मात्र कॅरीची खेळण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडियामध्ये होऊ शकतात हे बदल तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका घशात घातली आहे. त्यामुळं आगामी कसोटी मालिकेच्या आधी काही खेळाडूंना आज विश्रांती मिळू शकते. आज केएल राहुलऐवजी शिखर धवन आणि संजू सॅमसन सलामीला येऊ शकतात तर मनीष पांडेला संधी मिळू शकते. भारताने सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेंट्सनी पराभव केला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका घशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 धावांच आव्हान भारतानं दोन चेंडू बाकी राखत पार केलं होतं. तर पहिल्या सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं बाजी मारली होती. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांचीच मजल मारता आली होती. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन ऑस्ट्रेलिया- मॅथ्यू वेड (कप्तान), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मोइजेज हेनरिक्स, मिचेल स्वेपसन, सीन अबॉट, डॅनियल सॅम्स, अॅडम झम्पा आणि एजे टाय. भारत- केएल राहुल/मनीष पांडे, शिखर धवन, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, दीपक चहर, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि टी नटराजन.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन 28 धावांवर बाद