IND vs AUS 3rd ODI : भारत 248 धावांवर सर्वबाद, सामना 21 धावांनी गमावला
India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.
भारत 49.1 षटकांत 248 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे सामना भारताने 21 धावांनी गमावला असून मालिकाही 2-1 ने गमावली आहे.
भारताला एक मोठा झटका बसला असून हार्दिक पांड्या 40 धावा करुन बाद झाला आहे. झाम्पाच्या गोलंदाजीवर स्मिथनं त्याला झेलबाद केलं.
37 धावा करुन भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल बाद झाला आहे. अॅडम झाम्पाने त्याला बाद केलं आहे.
30 धावा करुन भारतीय कर्णधार रोहित शर्मा तंबूत परतला आहे. आता शुभमन आणि विराट क्रिजवर आहेत.
269 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद झाला असून भारताला विजयासाठी 270 धावाचं आव्हान मिळालं आहे.
अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजनं एक-एक विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलियाचे एकूण 9 गडी तंबूत परतले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद झाले असून 41 ओव्हरनंतर त्यांचा स्कोर 213 वर 7 बाद आहे.
कुलदीप यादवनं मार्नस लाबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर यांना बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
हार्दिक पांड्यानं सामन्यातील तिसरी विकेट मिचेल मार्शच्या रुपात बाद केलं आहे. मार्श 47 धावांवर बाद झाला आहे.
हार्दिक पांड्यानं स्टिव्ह स्मिथला शून्यावर बाद करत दुसरी विकेट घेतली आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 33 धावांवर बाद. माघारी परतला. हार्दिक पांड्यानं घेतली विकेट.
नाणेफेक आज ऑस्ट्रेलियानं जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
IND vs AUS 3rd ODI Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील यांच्यात सुरु एकदिवसीय सामन्यांतील तिसरा आणि अखेरचा सामना आज चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असल्याने आता तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. यंदाच्या वर्षीच एकदिवसीय चषक खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची आहे, तर अशा या महत्त्वाच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल...
कशी आहे खेळपट्टी?
आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट (Chennai Cricket stadium) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एमए चिदंबरम (MA Chindabaram) असं नाव असणाऱ्या या स्टेडियमची खेळपट्टी (Pitcj Report) जी एकेकाळी वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती, ती आता संथ आणि फिरकीपटूंना मदत करण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही डावातील सरासरी धावसंख्या 250 पेक्षा जास्त झालेली नाही. परंतु, सध्या असणाऱ्या हवामानाच्या अंदाजानुसार, वेगवान गोलंदाजांना खेळाच्या सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) हा तिसरा एकदिवसीय सामना (IND vs AUS 3rd) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
हे देखील वाचा-
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -