IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd ODI Match) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर (Saurashtra Cricket Association Stadium) होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी दोन्ही संघाला विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची अखेरची संधी असेल.  भारतीय संघाने मालिकेत २-० च्या फरकाने आधीच बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानात (Saurashtra Cricket Association Stadium) ऑस्ट्रेलियाला (Australia cricket team) क्लिनस्वीप देऊन विश्वचषकात दिमाखात आगमन करण्यासाठी भारतीय संघ उतरेल. तर अखेरचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असेल. दोन्ही संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चित मानला जातोय. 


भारतीय संघात कोणकोणते बदल - 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल अखेरच्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नसतील.  दरम्यान, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल पहिल्या दोन्ही सामन्यात संघाचा भाग नव्हते. पण राजकोटमध्य दोन्ही खेळाडू कमबॅक करतील असे म्हटले जात होते. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर हे तिसर्‍या वनडेमध्ये सहभागी होणार नाहीत. इंदूर वनडेत शुभमन गिलने शानदार शतक झळकावले होते. या सामन्यात शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.


कोण कोण परतले - 


भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह संघासोबत जोडले आहेत. अखेरच्या वनडेत हे खेळाडू संघाचा भाग असतील.


ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कचे कमबॅक -


पहिल्या दोन सामन्यात मॅक्सवेल आणि स्टार्क ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नव्हते. पण आता तिसऱ्या सामन्यात ते कमबॅक करण्यास तयार झाले आहेत. ऑस्ट्रेलियासाठी ही जमेची बाजू होय.  याशिवाय, भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो, असे मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया संघात ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कचे पुनरागमन संघाला मजबूत करेल. ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ग्लेन मॅक्सवेलकडून फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर मिचेल स्टार्कच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी मजबूत होईल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -


वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.