IND vs AUS 3rd ODI LIVE: कांगारु शेवट गोड करणार की भारत क्लिन स्वीप देणार, लाईव्ह अपडेट
IND vs AUS 3rd ODI LIVE Score Updates : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे.
ऑस्ट्रेलियाचा ६६ धावांनी विजय
रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला नववा धक्का बसलाय.
भारताला आठवा धक्का... बुमराह तंबूत
भारताला सातवा धक्का... कुलदीप यादव बाद
४८ धावांवर श्रेयस अय्यर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने घेतली चौथी विकेट
सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताला आणखी एक धक्का बसला आहे. सूर्या आठ धावांवर बाद झाला
केएल राहुलच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. राहुल २६ धावा काढून बाद झाला आहे. भारत चार बाद २२३ धावा
भारताचे द्विशतक.... श्रेयस अय्यर आणि राहुलमध्ये जबराट भागिदारी
विराट कोहलीच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसलाय. कोहली ५६ धावांवर बाद झालाय. मॅक्सवेलने घेतली तिसरी विकेट
भारताला दुसरा धक्का, ८१ धावांवर रोहित शर्मा बाद
रोहित शर्माचे दमदार अर्धशतक... भारताची दमदार सुरुवात
वॉशिंगटन सुंदरच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय. सुंदर १८ धावांवर बाद झालाय.
रोहित शर्माचे दमदार अर्धशतक... ३० चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने ठोकले अर्धशतक... भारताची वादळी सुरुवात
भारताचे अर्धशतक फलकावर
रोहित शर्मा-वॉशिंगटन सुंदरची दमदार सुरुवात... भारत बिनबाद 32 धावा
रोहित शर्मा आणि वॉशिंगटन सुंदर सलामीला... विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार
ऑस्ट्रेलियाची ३५२ धावांपर्यंत मजल
लाबुशेनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसलाय
मार्नस लाबुशेन याची अर्धशतकी खेळी. ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल
कॅमरुन ग्रीनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसलाय. हाणामारीच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची हराकिरी
जसप्रीत बुमराहने धोकादायक मॅक्सवेलचा त्रिफाळा उडवला
अॅलेक्स कॅरीला बाद करत बुमराहने भारताला मिळवून दिले चौथे यश
ऑस्ट्रेलियाने पार केला २५० धावांचा टप्पा...
स्मिथला ७४ धावांवर बाद करत सिराजने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला
मिचेल मार्शचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. मार्शला ९६ धावांवर कुलदीप यादवने बाद केले. मार्शने ८४ चेंडूत तीन षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया दोन बाद २२८ धावा... स्मिथ ६८ धावांवर खेळत आहे.
वनडे क्रिकटमध्ये स्टिव्ह स्मिथने पाच हजार धावांचा पल्ला पार केला.
ऑस्ट्रेलियाचे दीडशतक फलकावर लागले आहे. स्मिथ आणि मार्शची दमदार फलंदाजी... ऑस्ट्रेलिया एक बाद १५२
डेविड वॉर्नरनंतर मिचेल मार्श याचेही अर्धशतक... ऑस्ट्रेलिया एक बाद १३० धावा
१२ षटकातच ऑस्ट्रेलियाने फलकावर १०० धावा लावल्या आहेत. मिचेल मार्श आणि स्मिथ यांची फटकेबाजी सुरु आहे.
अर्धशतकानंतर डेविड वॉर्नर बाद झाला. डेविड वॉर्नर ५६ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया ८ षटकानंतर एक बाद ७८ धावा
वॉर्नर-मार्शची वादळी सुरुवात... ऑस्ट्रेलिया सहा षटकात ५४ धावा
मिचेल मार्श याने भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. बुमराहच्या एकाच षकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला.
ईशान किशन आजारपणामुळे राजकोट येथील वनडे सामन्यात अनुपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मांकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे चार स्थानिक खेळाडू संपूर्ण सामन्यात ड्रिंक्स आणि क्षेत्ररक्षणासाठी संघाला पाठिंबा देतील.
विश्वचषकाआधी काही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. ते संघासोबत नाहीत. त्यामुळे स्थानिक चार खेळाडूंना संघासोबत जोडले गेलेय. हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, शुभमन गिल, आर. अश्विन आणि मोहम्मद शामी संघासोबत नाहीत. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. गरज पडल्यास हे खेळाडू फिल्डिंगसाठीही मैदानात उतरतील.
सामन्याला सुरुवात झाली. वॉर्नर-मार्श फलंदाजीसाठी मैदानात... बुमराहच्या हातात चेंडू
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, तनवीर सांघा, जोश हेजलवूड
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
Rohit (C), Kohli, Iyer, KL (WK), Surya, Jadeja, Sundar, Kuldeep, Bumrah, Siraj and Prasidh Krishna
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात बुधवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पण बुधवारी राजकोटमधील वातावरण कसं आहे. पावसाची शक्यत आहे. बुधवारी राजकोटमधील तापमान ३३ डग्री सेल्सिअस इतके असेल. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहील. रिमझिम पावसाचीही शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र, हवामान खात्यानुसार राजकोटमध्ये सामन्याच्या दिवशी फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन पूर्ण होईल.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पार्श्वभूमी
IND vs AUS 3rd ODI LIVE Score Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd ODI Match) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर (Saurashtra Cricket Association Stadium) होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी दोन्ही संघाला विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची अखेरची संधी असेल. भारतीय संघाने मालिकेत २-० च्या फरकाने आधीच बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानात (Saurashtra Cricket Association Stadium) ऑस्ट्रेलियाला (Australia cricket team) क्लिनस्वीप देऊन विश्वचषकात दिमाखात आगमन करण्यासाठी भारतीय संघ उतरेल. तर अखेरचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असेल. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता सुरु होईल. एक वाजता नाणेफेक होईल.
तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता किती ? Weather Forecast
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात बुधवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पण बुधवारी राजकोटमधील वातावरण कसं आहे. पावसाची शक्यत आहे. बुधवारी राजकोटमधील तापमान ३३ डग्री सेल्सिअस इतके असेल. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहील. रिमझिम पावसाचीही शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र, हवामान खात्यानुसार राजकोटमध्ये सामन्याच्या दिवशी फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन पूर्ण होईल.
लाइव स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा अॅपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.
सामन्याची वेळ काय ?
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. एक वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.
शार्दूल बाहेर, हार्दिक आत -
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचे संभाव्या ११ शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -