Ind vs Aus 3rd ODI : सिडनीत रोहित अन् कोहलीचा तांडव! तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय, पण ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली. त्यामुळे मालिका जिंकण्याची संधी हुकली, आता प्रतिष्ठा जपण्याची लढत रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 25 Oct 2025 03:48 PM

पार्श्वभूमी

India vs Australia Live Score, 3rd ODI Match Latest Updates : पर्थनंतर टीम इंडियाचा अ‍ॅडलेडमधील पराभव झाला, सलग दोन सामने गमावल्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाने आधीच शिक्कामोर्तब केलं आहे....More

Ind vs Aus 3rd ODI : सिडनीत रोहित अन् कोहलीचा तांडव! तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय, पण ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील शानदार भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 46.4 षटकांत 236 धावा केल्या. प्रत्युत्तर रोहित शर्माने शतक आणि कोहलीने अर्धशतक केले. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 38.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 237 धावा करून सामना जिंकला. पण, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.