IND vs AUS 3rd ODI: तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकली. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकाआधी अखेरच्या वनडे सामन्यात दोन्ही संघात बदल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, कर्णधार पॅट कमिन्स संघात परतले आहेत. भारतीय संघात सहा बदल करण्यात आले आहेत. फॉर्मात असलेल्या ईशान किशन याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. याबाबत चर्चा सुरु झाल्या, पण बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली. 


ईशान किशन आजारपणामुळे राजकोट येथील वनडे सामन्यात अनुपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मांकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे चार स्थानिक खेळाडू संपूर्ण सामन्यात ड्रिंक्स आणि क्षेत्ररक्षणासाठी संघाला पाठिंबा देतील.







विश्वचषकाआधी काही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. ते संघासोबत नाहीत. त्यामुळे स्थानिक चार खेळाडूंना संघासोबत जोडले गेलेय. हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, शुभमन गिल, आर. अश्विन आणि मोहम्मद शामी संघासोबत नाहीत. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. गरज पडल्यास हे खेळाडू फिल्डिंगसाठीही मैदानात उतरतील. 


दरम्यान, शुभमन गिल आणि ईशान किशन हे दोन्ही फलंदाज उपलब्ध नसल्यामुळे रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येणार आहे.


नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने - 
अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघही पूर्णपणे बदललेला आहे. भारतीय संघामध्ये सहा बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर, अश्विन आणि मोहम्मद शामी हे खेळाडूही प्लेईंग ११ मध्ये नाहीत. 


दोन्ही संघाची प्लेईंग ११ - 


भारत - 
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा


ऑस्ट्रेलिया - 
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, तनवीर सांघा, जोश हेजलवूड