IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd ODI Match) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर (Saurashtra Cricket Association Stadium) सुरु आहे. या अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघही पूर्णपणे बदललेला आहे. भारतीय संघामध्ये सहा बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर, अश्विन आणि मोहम्मद शामी हे खेळाडूही प्लेईंग ११ मध्ये नाहीत. 


विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची दोन्ही संघांना ही अखेरची संधी आहे.  भारतीय संघाने मालिकेत २-० च्या फरकाने आधीच बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानात (Saurashtra Cricket Association Stadium) ऑस्ट्रेलियाला (Australia cricket team) क्लिनस्वीप देऊन विश्वचषकात दिमाखात आगमन करण्यासाठी भारतीय संघ उतरेल. तर अखेरचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असेल.






भारताचे ११ शिलेदार कोणते ? India's playing XI:


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा


Rohit (C), Kohli, Iyer, KL (WK), Surya, Jadeja, Sundar, Kuldeep, Bumrah, Siraj and Prasidh Krishna






ऑस्ट्रेलिया संघात कोण कोण - 


डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, तनवीर सांघा, जोश हेजलवूड


भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -


वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 148 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 56 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 69 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 32 वेळा पराभव केला आहे.