India vs Australia 2nd Test live Streaming : भारतीय क्रिकेट संघ आता मिशन ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे की रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला आहे, तर शुभमन गिलही दुखापतीतून सावरला आहे. म्हणजे संपूर्ण संघ पूर्णपणे तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार आहे. पण दुसरा कसोटी सामना डे-नाईट असल्यामुळे वेळेत बदल करण्यात आला आहे. 

पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाला. मात्र दुसरा सामना पिंक बॉलने खेळवला जाईल आणि तो डे-नाईट असेल. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करताना हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता ऑस्ट्रेलियाची डे नाईट टेस्ट भारतात दिवसभर चालणार आहे. म्हणजेच सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियात रात्र झालेली असेल. म्हणजे दुसऱ्या सामन्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. 

भारतीय वेळेनुसार डे-नाईट कसोटी सामन्याच्या सत्राची वेळ....

ॲडलेड कसोटीचे पहिले सत्र भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत असेल, त्यानंतर जेवणाचा ब्रेक होईल, त्यानंतर 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 12 वाजता दोन्ही संघ दुसऱ्या सत्रासाठी आमने-सामने होतील.

दुसरे सत्र दुपारी 2:10 वाजेपर्यंत खेळले जाईल आणि त्यानंतर 20 मिनिटांचा चहा ब्रेक होईल.

शेवटच्या सत्राचा खेळ दुपारी 2:30 वाजता सुरू होईल आणि 4:30 वाजता स्टंप होईल. सामन्यादरम्यान पाऊस पडला किंवा इतर कारणांमुळे सामना थांबवावा लागला, तर अशा परिस्थितीत सत्राच्या वेळेत बदल होऊ शकतो.

भारतीय संघ जास्त डे-नाईट कसोटी खेळत नाही, त्यामुळे त्यांना सवय नाही. भारतीय संघ आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा परदेशी भूमीवर डे-नाईट कसोटी खेळताना दिसणार आहे. पण हेही लक्षात ठेवा की भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या पिंक बॉलच्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीनही पिंक बॉलच्या कसोटी भारताने जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना रोहित शर्मा आणि शुभमन गिलशिवाय जिंकला आहे, त्यामुळे त्याचे मनोबल उंचावले आहे. 

हे ही वाचा -

IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी

Ind Vs Aus 2nd Test : कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री