IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | दुसऱ्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय

Advertisement

IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. फलंदाजीत सरस कामगिरी करणाऱ्या भारताने गोलंदाजीतही कमाल केली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Dec 2020 09:37 AM
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर आटोपला असून भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं आव्हान आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी भारताकडे आहे.
Continues below advertisement
बॉक्सिंग डे कसोटीत 70 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल पाच धावांवर बाद झाला आहे.

पार्श्वभूमी

मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन धावांची आघाडी असून चार विकेट्स हातात आहेत.


 


दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे 112 धावांवर बाद झाला. त्यानंतर 57 धावा करुन रवींद्र जडेजाही माघारी परतला. मग भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. परिणामी टीम इंडियाने 131 धावांची आघाडी घेतली.


 


यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची घसरगुंडी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे दाणादाण उडवत सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. तिसरा दिवस संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. कॅमरुन ग्रीन 17 धावा आणि पॅट कमिन्स 15 धावा करुन नाबाद आहेत.


 


आता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच सामना संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तर अर्धशतकी खेळ करणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने दोन विकेट्स घेतल्या.


 


पहिला सामन्यातील लाजिरवाणा पराभव आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फेव्हरेट समजलं जात होतं. होतं. परंतु टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केलं आहे. ज्या पीचवर टीम इंडियाने 300 पेक्षा धावा केल्या, त्यावर ऑस्ट्रेलिया एका फलंदाजाला अर्धशतकही करता आलेलं नाही.


 


प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


 


ऑस्ट्रेलियन संघ : जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॉथन लिएन, जोश हेजलवुड.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.