= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Score : भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा खेळ, गोलंदाजीही फिकी; ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-20 मध्ये 4 विकेट्सनी विजय ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी दिलेले 126 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकांत सहा गडी गमावून गाठले. या विजयासह कांगारूंनी पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा सामना 2 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : अभिषेकची अर्धशतकी खेळी, बाकी सगळे नापास! भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 126 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या अपडेट्स दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियासमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला 18.4 षटकांत 125 धावांत गुंडाळले. भारताची सुरुवात खराब झाली, 50 धावांपेक्षा कमी धावांत पाच विकेट गमावल्या. पण, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले आणि भारताला 120 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS: टीम इंडियाचे एकापोठापाठ एक, अर्धा संघ तंबूत परतला = liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : टीम इंडियाला धक्क्यावर धक्के, गिलनंतर संजू आला अन् गेला भारताला 23 धावांवर दुसरा धक्का बसला. सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संजू सॅमसन आला, पण त्याला प्रभाव पाडता आला नाही आणि तो एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादव आता अभिषेक शर्मासोबत क्रीजवर आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : भारताला पहिला धक्का बसला, शुबमन गिल OUT शुबमन गिलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. गिल 10 चेंडूत पाच धावा करून बाद झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : मेलबर्नमध्ये कर्णधार सूर्याचा मोठा निर्णय सूर्यकुमार यादव म्हणाला की, प्रथम फलंदाजी करण्यास आनंद होत आहे. आम्हाला खेळायचे आहे तेच क्रिकेट आहे. आम्ही त्याच संघाविरुद्ध खेळत आहोत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : मिचेल मार्शने घेतला मोठा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : मेलबर्नमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांचा इतिहास मेलबर्नमध्ये आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 टी20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, म्हणजेच या मैदानावर टीम इंडियाचं वर्चस्व दिसतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : मेलबर्नमध्ये कसे आहे हवामान? पहिल्या टी-20 सामन्यात भारताने तुफानी सुरुवात केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी आक्रमक फलंदाजी केली, पण 9.4 षटकांनंतर पावसाने सामना थांबवला. आता चाहत्यांना मेलबर्नमध्ये पूर्ण सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा असली तरी अॅक्यूवेदरचा (AccuWeather) अंदाज काहीसा निराशाजनक आहे.
रिपोर्टनुसार, 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये 87% पावसाची शक्यता आहे. आकाश दिवसभर ढगाळ राहील आणि 17% शक्यता वीजांसह हलक्या सरींचीही आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे, सामन्याच्या वेळेत 70% पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे, ज्यामुळे सुमारे 1.4 मिमी पाऊस पडू शकतो.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score :मेलबर्नमधील खेळपट्टी कशी असेल? मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील खेळपट्टी पारंपरिकपणे गोलंदाजांना थोडी मदत करते. मोठे मैदान असल्याने फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नसते. तरीही अलीकडच्या बिग बॅश लीग (BBL) सामन्यांत येथे मोठे धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस यानेही सांगितले की, सध्याच्या MCG पिचवर फलंदाजी काहीशी सुलभ झाली आहे. मात्र ढगाळ वातावरणात गोलंदाजांना स्विंग मिळू शकते, त्यामुळे दोन्ही संघ रणनीती आखताना हवामान आणि पिच या दोन्ही गोष्टींचा विचार करतील.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा सामना कुठे आणि कधी पाहू शकता? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) वर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार वेळ दुपारी 1:45 वाजता सुरू होईल. जो थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क होईल, तर ऑनलाइन स्ट्रिमिंग जिओहॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia) सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 2nd T20 Live Score : भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- (Australia T20 Squad vs India) मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (सामने 1-3), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने 3-5), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (सामने 4-5), नाथन एलिस, जोश हेझलवूड (सामने 1-2), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल (सामने 3-5), मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.