IND vs AUS 2nd Test Match Time : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली कसोटी जिंकली आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. 


पिंक बॉल कसोटी ही डे नाईट खेळवली जाईल. मात्र, पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार बदलणार आहे. या कसोटीत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. पण रोहित नुकताच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, आणि त्याने संघासोबत सराव सुरू केला.


दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणारा पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होत होता, परंतु ॲडलेड कसोटीची वेळ वेगळी आहे. ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे नाईट टेस्ट मॅचला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल. नाणेफेक अर्धा तास आधी 9 वाजता होईल. म्हणजेच या टेस्टचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांची झोप मोड होणार नाही.


भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने आत्तापर्यंत 4 डे नाईट कसोटी खेळल्या आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. भारतीय संघाने यापूर्वी ॲडलेडमध्ये यजमान संघासोबत पिंक बॉल कसोटी सामना खेळला असून त्यात त्यांचा 8 गडी राखून पराभव झाला होता. पिंक बॉलच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम उत्कृष्ट आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले असून त्यात फक्त एकच पराभव पत्करावा लागला आहे.


दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे :


पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, नॅथन मॅकस्विनी. , स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.


बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :


यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.


राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी.


हे ही वाचा -


Ind vs Aus 2nd Test : पराभवाच्या जखमेनं बेभान झालेल्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या शिकारीसाठी विणलं जाळं; बाहुबली खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री