IND vs AUS 2nd ODI LIVE: भारत मालिका जिंकणार की ऑस्ट्रेलिया बरोबरी साधणार, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs AUS 2nd ODI LIVE Score Updates : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 24 Sep 2023 10:06 PM
भारताचा ९९ धावांनी विजय

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99  धावांनी विजय मिळवला.  भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.

भारत जिंकला

भारत जिंकला... ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांत आटोपला

ऑस्ट्रेलियाला नववा धक्का

जोश हेजलवूडच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला नववा धक्का बसलाय. हेडलवूडने २३ धावांची खेळी केली

भारताला आठवे यश

रविंद्र जाडेजाने जम्पाला केले बाद

भारताला आठवे यश

रविंद्र जाडेजाने जम्पाला केले बाद

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

कॅमरुन ग्रीन १९ धावांवर धावबाद झाला.. ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

ऑस्ट्रेलियाला  सहावा धक्का बसलाय. कॅरीला जाडेजाने केले बाद

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतलाय. डेविड वॉर्नरचे अर्धशतक

थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात,,..४१ षटकात ३४४ धावांचे ऑस्ट्रेलियाला आव्हान 

कव्हर्स काढले

पावसाच्या विश्रांतीनंतर कव्हर्स काढले आहेत.... थोड्याच वेळात पंच मैदानाची पाहणी करणार आहेत.

षटके कमी होण्यास सुरुवात

इंदौरमध्ये पावसाची हजेरी

इंदौरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी..... सामना प्रभावित

ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, दोन फलंदाज तंबूत

400  धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे. सलामी फलंदाज मॅथ्यू शॉर्ट ९ धावांवर तंबूत परतला. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथ याला खातेही उघडता आले नाही. चार षटकानंतर ऑस्ट्रेलिया दोन बाद २२ धावा... डेविड वॉर्नर ९ आणि लाबुशेन तीन धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचे आव्हान

IND Vs AUS, Innings Highlights : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निर्धारित ५० षटकात भारताने पाच बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी वादळी शतके ठोकली. तर केएल राहुलने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाकडून एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४०० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

कॅमरुन ग्रीनची धुलाई

कॅमरुन ग्रीन याने दहा षटकांत १०० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. ग्रीनला फक्त एक विकेट घेता आली.

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक पूर्ण...  सूर्याने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक ठोकले.. 

केएल राहुल तंबूत

कॅमरुन ग्रीनने केएल राहुलला पाठवले तंबूत.... भारताला पाचवा धक्का.... धावसंख्या ३५५ धावा

भारताच्या साडेतीनशे धावा

भारताच्या ३५० धावा पूर्ण झाल्या आहेत....  सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी कांगारुंचा समाचार घेतला... 

केएल राहुलचे अर्धशतक

मोहालीनंतर इंदौरमध्येही केएल राहुलचे अर्धशतक.. ३५ चेंडूत ठोकले अर्धशतक

कॅमरुन ग्रीनला धुतले

सूर्यकुमार यादवने कॅमरुन ग्रीनला लागोपाठ चार षटकार मारले..

भारताला चौथा धक्का

ईशान किशनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसलाय. किशन याने १८ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत ३१ धावा केल्या..

भारताचे त्रिशतक

ईशान किशन याने षटकार मारत भारताच्या तीनशे धावा फलकावर लावल्या..

राहुल-किशनमध्ये अर्धशतकी भागिदारी

राहुल-किशनमध्ये अर्धशतकी भागिदारी... भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

गिल दा मामला...

शुभमन गिलने ३५ व्या वनडे सामन्यात सहावे शतक ठोकले. त्याने ३५ डावात आतापर्यंत १९०० धावा चोपल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्याच्या ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे.  या शतकासह गिलने यावर्षी वनडेत १२०० धावांचा आकडाही गाठला आहे. 

इशान किशची वादळी फलंदाजी

इशान किशन १४ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे. अखेरच्या षटकांमध्ये किशन आणि राहुल कांगारुंचा समाचार घेत आहेत.

शतकानंतर शुभमन गिल तंबूत

 


शतकी खेळी केल्यानंतर शुभमन गिल बाद झाला.. भारत तीन बाद २४९ धावा

शुभमन गिलचा शतकी तडाखा

श्रेयस अय्यरपाठापोठ शुभमन यानेही शतकाला गवसणी घातली. ९२ चेंडूत गिलने झळकावले शतक. या शतकी खेळीत गिलने सहा चौकार आणि चार षटकार मारले. भारत दोन बाद २३० धावा.

भारताची मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल

३३ षटकात भारत दोन बाद २३० धावा

श्रेयस अय्यरचे दमदार शतक

श्रेयस अय्यरचे  दमदार शतक... ९० चेंडूत १०५ धावांवर अय्यर बाद

भारताची दमदार सुरुवात

प्रथम फलंदाजी करताना भारताने दमदार सुरुवात केली आहे. २९ षटकानंतर भारताने एक बाद २०२ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ९२ तर श्रेयस अय्यर ९४ धावांवर खेळत आहे.

भारताच्या २०० धावा

गिल आणि अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २९ षटकात २०० धावा फलकावर लावल्या आहेत.

श्रेयस अय्यर आणि गिल यांची दमदार फलंदाजी

श्रेयस अय्यर आणि गिल यांची दमदार फलंदाजी... दोघांमध्ये दीडशतकी भागिदारी झाली आहे. दोघेही शतकानजीक पोहचले आहेत. भारत एख बाद १९४ धावा

श्रेयस अय्यरचे दमदार कमबॅक

 


दुखापतीमुळे श्रेयस अय्यर भारतीय संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने कमबॅक केले. पण आशिया चषकात त्याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दुखापतीमुळे पुन्हा बाहेर बसावे लागले होते. पण दुसऱ्या वनडे सामन्यात अय्यरने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.  श्रेयस अय्यर सध्या ८० धावांवर खेळत आहे. त्याने ६३ चेंडूमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने दमदार खेळी केली. भारत एक बाद १७४ धावा

अय्यर-गिलची जोडी जमली

श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. दोघांमध्ये १४८ धावांची भागिदारी झाली आहे. भारत एक बाद १६४ धावा

शुभमन गिलनंतर अय्यरचेही अर्धशतक

श्रेयस अय्यरने षटकार मारत पूर्ण केले अर्धशतक.... भारत एक बाद १२८ धावा

गिल ऑन फायर

षटकार मारत शुभमन गिलने ठोकले अर्धशतक.. भारत एक बाद १०६ धावा

टीम इंडियाचे शतक

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची दमदार फलंदाजी सुरु आहे. १३ व्या षटकात भारताचे शतक फलकावर लागलेय. गिल ४५ तर अय्यर ४० धावांवर खेळत आहेत.

भारताची चिंता मिटली

विश्वचषकाआधी टीम इंडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबात प्रश्नचिन्हे होती. पण दुसऱ्या वनडेत अय्यरने दमदार फलंदाजी केली.

पावसाची विश्रांती

सामन्याला सुरुवात झाली आहे.

इंदौरमध्ये पावसाला सुरुवात

अय्यर-गिलने डाव सावरला

अय्यर-गिलने डाव सावरला... भरताची दमदार सुरुवात

भारताला पहिला धक्का

ऋतुराज गायकवाड बाद.. हेजलवूडने दिला पहिला धक्का

सामन्याला सुरुवात

सामन्याला सुरुवात.... ऋतुराजने पहिल्याच चेंडूवर मारला चौकार

ऑस्ट्रेलियाचे ११ खेळाडू कोणते ?

डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नश लाबुशेन, जोश इंग्लिश, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, एडम जम्पा, जोश हेजलवुड, स्पेंसर जॉनसन.

भारताचे ११ शिलेदार

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव . शार्दूल ठाकूर, आर. अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शामी

भारतीय संघात एक बदल

जसप्रीत बुमराह याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला स्थान

ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल

कर्णधार पॅट कमिन्स, मार्कस स्टॉयनिसला आराम.. स्मिथकडे नेतृत्वात...

भारताची प्रथम फलंदाजी

भारताची प्रथम फलंदाजी

ऑस्ट्रेलियान नाणेफेक जिंकली

ऑस्ट्रेलियान नाणेफेक जिंकली

आज बुमराह अनुपलब्ध

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

पार्श्वभूमी


IND vs AUS 2nd ODI LIVE Score Updates : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे. पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात झाला. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. आता दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअमवर रंगणार आहे.  कधी कुठे पाहता येणार, हा सामना.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेबाबत सर्व माहिती एका क्लिकवर...


सामन्याची वेळ काय ?


मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअवर होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरु पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना होईल. हा सामना दुपारी 1.30 पासून खेळले जातील. एक वाजता नाणेफेक होईल. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.


कुठे पाहाल सामना ?-









 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा अॅपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.


खेळपट्टी कशी ?


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी इंदौरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला मदत मिळू शकते.  रविवारी होणाऱ्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजाना अडचणीत टाकू शकतात.


दुसऱ्या वनडेत मुसळधार पावसाचा अंदाज - 
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर रोजी इंदौरध्ये ढगाळ वातावरण असेल. सायंकाळनंतरही इंदौरमध्ये पावसाची शक्यता आहे. इंदौरमध्येही सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.


भारताची संभाव्य प्लेईंग  -


शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर / कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी


ऑस्ट्रेलियाची संभाव्य  प्लेइंग 11-


डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कैमरून ग्रीन, जोश इंगलिस (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट आणि एडम जम्पा


भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याचा लेखाजोखा -


मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -


वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 147 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 55 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 68 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 31 वेळा पराभव केला आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.