IND vs AUS 1st T20I : वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.
पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी, भारतीय संघात फक्त दोनच खेळाडू असतील जे 2023 च्या विश्वचषकाचा भाग होते, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णाने विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पिच रिपोर्ट
विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत मिळते. त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीवर मदत आहे. त्याशिवाय या मैदानावर धावांचा पाठलाग करणे चांगले आहे, कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 67 टक्के सामने जिंकले आहेत.
मॅच प्रिडिक्शन
ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे जे विश्वचषकात कांगारू संघाचा भाग होते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया संघात अधिक अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी सोपे नसेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ फेव्हरिट ठरू शकतो.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, शिवम दुबे/यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, अक्षर पटेल/वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11
स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, जोश इंगलिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडोर्फ, तनवीर सांघा.