Ind vs Aus 1st Test : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत आहे. सीनियर संघापूर्वी अ संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता आणि तेथे दोन चार दिवसीय सामने खेळले. संघाला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा चांगला अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर अ संघातील खेळाडूंने वरिष्ठ संघासोबत सराव केला. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि अ दौऱ्यात छाप पाडणारा साई सुदर्शन या दोघांनाही भारतात परत पाठवण्यात आले आहे.
ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन परतले भारतात
रिपोर्टनुसार, सुदर्शन आणि ऋतुराजसह संपूर्ण भारत अ संघ भारताला रवाना झाला आहे. देवदत्त पडिक्कलला वरिष्ठ संघासोबत ठेवण्यात आले आहे. ऋतुराजने शनिवारी मॅच सिम्युलेशनमध्ये आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले होते. त्याने आऊट न होता तासभर फलंदाजी केली आणि तीन वेगवेगळ्या गोलंदाजांवर एकूण चार षटकार ठोकले. दुसरीकडे, डावखुरा फलंदाज सुदर्शनने शानदार शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या डावात 103 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो 0 आणि 3 च्या स्कोअरवर बाद झाला.
या दोघांना पाठवून बीसीसीआयने केली का चूक?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही, तर शुभमन गिलही दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. सध्या भारताकडे केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत डावाची सुरुवात करण्याचा पर्याय आहे. अभिमन्यू ईश्वरन देखील बॅकअप सलामीवीर म्हणून संघासोबत आहे.
मात्र, असे असतानाही कदाचित ऋतुराज आणि सुदर्शनला पाठवण्यात थोडी घाई झाली असावी. या दोन्ही गोष्टी थांबवायला हव्या होत्या, कारण अचानक गरज पडल्यास तुमच्याकडे पर्यायांची कमतरता नाही. विशेषत: सुदर्शनने केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर काउंटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार) (पहिल्या कसोटीतून बाहेर), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा.
राखीव खेळाडू : खलील अहमद, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी
हे ही वाचा -