IND Vs AUS Live Score : पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
India Vs Australia 1st T20 Live Updates : सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करणार आहे. आजपासून दोन संघामध्ये पाच सामन्याची टी 20 मालिका सुरु होणार आहे.
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 23 Nov 2023 10:45 PM
पार्श्वभूमी
IND vs AUS 1st T20I : सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करणार आहे. आजपासून दोन संघामध्ये पाच सामन्याची टी 20 मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी विशाखापट्टणमच्या...More
IND vs AUS 1st T20I : सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करणार आहे. आजपासून दोन संघामध्ये पाच सामन्याची टी 20 मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी विशाखापट्टणमच्या मैदानात टी20 मध्ये दोन संघ आमनेसामने असतील. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी, भारतीय संघात फक्त दोनच खेळाडू असतील जे 2023 च्या विश्वचषकाचा भाग होते, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णाने विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पिच रिपोर्टविशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत मिळते. त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीवर मदत आहे. त्याशिवाय या मैदानावर धावांचा पाठलाग करणे चांगले आहे, कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 67 टक्के सामने जिंकले आहेत. मॅच प्रिडिक्शन ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे जे विश्वचषकात कांगारू संघाचा भाग होते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया संघात अधिक अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी सोपे नसेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ फेव्हरिट ठरू शकतो.भारताची संभाव्य प्लेईंग 11 सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, शिवम दुबे/यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, अक्षर पटेल/वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार. ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11 स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, जोश इंगलिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडोर्फ, तनवीर सांघा. विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे?- पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम- दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम- तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी- चौथा सामना- 01 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर- पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार, अखेरच्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. त्याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताचा ऑस्ट्रेलियावर दोन विकेटने विजय
रिंकू सिंहने षटकार मारत भाराताला विजय मिळवून दिले. एका चेंडूवर एका धावेची गरज असताना रिंकूने षटकार लगावला.