IND vs AUS Live Score: विश्वचषकाआधी थरार, भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने, लाईव्ह अपडेट

IND vs AUS 1st ODI LIVE Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान आजपासून तीन सामन्याच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 22 Sep 2023 09:46 PM
मालिकेत भारताची आघाडी

मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच विकेटने विजय

भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच विकेटने विजय... केएल राहुलचे नाबाद अर्धशतक

भारताचा अर्धा संघ तंबूत

अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव बाद झाला... भारताला पाचवा धक्का... भारताला विजयासाठी १२ धावांची गरज

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक... 

भारताने २५० धावसंख्या केली पार

सूर्या आणि राहुल जोडी जमली आहे. भारताने २५० धावसंख्या पार केली... भारताला विजयासाठी २९ चेंडूत २४ धावांची गरज 

टीम इंडियाला ५४ धावांची गरज

मोहाली वनडे जिंकण्यासाठी भारताला दहा षटकात ५४ धावांची गरज आङे. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव मैदानात

कमिन्सने जोडी फोडली

इशान किशनला बाद करत कमिन्सने भारताला चौथा धक्का दिला. ईशान किशन १८ धावांवर बाद

राहुल-ईशानची जोडी जमली

लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि ईशान किशन यांनी भारताचा डाव सावरलाय. किशन १८ तर राहुल १५ धावांवर खेळत आहेत. भारत तीन बाद १८४ धावा.. भारताला विजयासाठी १८ षटकात ९३ धावांची गरज

भारताला लगोपाठ दोन धक्के

अय्यर आणि गिल एकामागोमाग बाद.. भारत 3 बाद 156 धावा

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का बसला... अर्धशतकानंतर ऋतुराज गायकवाड बाद झाला

गिल-ऋतुराजने धुतले

गिल-ऋतुराजने धुतले.... भारताची दमदार सुरुवात... भारत बिनबाद १२६ धावा

ऋतुराजचे अर्धशतक

शुभमन गिल याच्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाड यानेही अर्धशतक ठोकले... भारत बिनबाद ११२ धावा

भारताची वादळी सुरुवात

शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी वादळी सुरुवात केली आहे. शुभमन गिल याने अर्धशतक ठोकलेय. भारत बिनबाद १०० धावा

भारताचे फलकावर अर्धशतक

२७७ धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. भारताने बिनबाद अर्धशतक झळकावलेय.

भारताची दमदार सुरुवात

ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलची दमदार सुरुवात.... भारत बिनबाद ४२ धावा

भारताला विजयासाठी 277 धावांची गरज

मोहम्मद शामीच्या भेदक माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांत रोखण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचं योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून मोहम्मद शामी याने पाच विकेट घेतल्या. अश्विन याचेही दमदार कमबॅक झाले. मोहाली वनडे जिंकण्यासाठी भारताला २७७ धावांचे आव्हान आहे. 

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

२७६ धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला.. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. भारताकडून शामीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

मोहम्मद शामीचा पंच

पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद शामीने भेदक मारा केला. शामीने दहा षटकात ५१ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. शामीने एक षटक निर्धाव फेकले

शमीचा भेदक मारा

सीन एबॉटच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला नववा धक्का बसलाय. शामीने घेतली पाचवी विकेट

शामीने दिला आणखी एक धक्का

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसलाय. मॅथ्यू शॉर्ट अवघ्या दोन धावांवर तंबूत परतलाय. ऑस्ट्रेलिया आठ बाद 254 धावा

ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का

जसप्रीत बुमराहने जॉश इंग्लिंशला पाठवले तंबत.. ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

शामीने स्टॉयनिसला पाठवले तंबूत..... ऑस्ट्रेलिया सहा बाद २४८ धावा

ऑस्ट्रलियाचा अर्धा संघ तंबूत

कॅमरुन ग्रीन ३१ धावांवर धावबाद झाला.. १८६ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतलाय...

सामन्याला सुरुवात

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मोहालीमध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया चार बाद १७० धावा

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची हजेरी

मोहालीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना थांबवावा लागलाय. 

ऑस्ट्रलियाला चौथा धक्का

मार्नस लाबुशेनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसलाय. अश्विनच्या गोलंदाजीवर लाबुशेन ३९ धावांवर बाद झाला. 

भारताला मोठं यश

मोहम्मद शामीने मिळवून दिले भारताला मोठे यश... जम बसलेल्या स्मिथला ४१ धावांवर केले बाद... ऑस्ट्रेलिया तीन बाद ११२ धाावा

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

रविंद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर डेविड वॉर्नर बाद झाला. वॉर्नरने स्मिथसोबत भारताचा डाव सावरला होता. पण धोकादायक होणाऱ्या वार्नरला जाडेजाने तंबूत धाडले. ऑस्ट्रेलिया दोन बाद ९८ धावा

डेविड वॉर्नरचे अर्धशतक

डेविड वॉर्नरचे अर्धशतक... ४९ चेंडूत दोन षटकार सहा चौकारांच्या मदतीने ठोकले अर्धशतक

स्मिथ-वॉर्नरची अर्धशतकी भागिदारी

चार धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर स्मिथ-वॉर्नरची अर्धशतकी भागिदारी... ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक

११.२ षटकानंतर ऑस्ट्रेलियाने फलकावर ५० धावा लावल्या आहेत. डेविड वॉर्नर आणि स्मिथ खेळत आहेत.

स्मिथ-वॉर्नर यांनी डाव सावरला

मिचेल मार्शची विकेट झटपट पडल्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर या जोडीने संयमी फलंदाजी सुरु केली आहे. 

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

मिचेल मार्श  बाद झालाय. मोहम्मद शामीने भारताला मिळवून दिले पहिले यश... चार धावांवर मार्श बाद

ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज मैदानात

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला उतरले आहेत. भारताकडून शामी गोलंदाजीसाठी तयार...

स्टार्क, मॅक्सवेल बाहेर

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सांगितले की, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाहीत. तसेच, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श डावाची सुरुवात करतील

भारताची प्लेईंग ११ -

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड,  श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, 


Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, KL Rahul (c/wk), Ishan Kishan, Suryakumar Yadav, Ravindra Jadeja, R Ashwin, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Shami

ऑस्ट्रेलियाच्या संघात कोण कोण ?

डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, अॅडम जम्पा


David Warner, Mitchell Marsh, Steven Smith, Marnus Labuschagne, Cameron Green, Josh Inglis (wk), Marcus Stoinis, Matthew Short, Pat Cummins (c), Sean Abbott, Adam Zampa

अश्विनला स्थान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मोहाली येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिलेय. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदरऐवजी आर. अश्विनला संधी दिली आहे. 

भारताची प्रथम गोलंदाजी

केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

राहुलने नाणेफेक जिंकली

राहुलने नाणेफेक जिंकली

पार्श्वभूमी

IND vs AUS 1st ODI LIVE Score Updates :



विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात होणार आहे. कधी कुठे पाहता येणार, हा सामना.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेबाबत सर्व माहिती एका क्लिकवर...


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -


आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौर आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे. 


सामन्याची वेळ काय ?









 


भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळले जातील. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.


कुठे पाहाल सामना -


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमावर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -


वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर ६७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 30 वेळा पराभव केला आहे. 


टीम इंडिया - 


केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा


ऑस्ट्रेलिया टीम:


पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा. 


भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषकात कधी भिडणार -  


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.  भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलेय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 वनडे मालिकेत 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.