IND vs AFG, World Cup :  रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभ केला होता. आज अफगाण संघाविरोधात बाजी मारली. भारताचा पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात अहमदाबाद येथे होणार आहे. 


भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे 31 वं आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या 63 चेंडूंमधल्या शतकाला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज आहे. 


दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमच्या सपाट खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 272 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत हे आव्हान सहज पार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली. विशेषकरुन रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. रोहितपुढे अफगाणिस्तानची गोलंदाजी अतिशय दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. रोहितच्या वादळात अफगाणिस्तानचे सर्वाच गोलंदाज उडून गेले.  रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या 18.4 षटकात 156 धावांची सलामी दिली. दोघांनीही अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला. 


रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या 112 धावांत 156 धावांची भागिदारी केली. ईशान किशन अर्धशतक करण्यात चुकला. ईशान किशन याने 47 चेंडूत 47 धावांची खेळी केली. रोहित शर्मा वादळी फलंदाजी करताना दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने संयमी फलंदाजी करत चांगली साथ दिली. ईशान किशन याने आपल्या 47 धावांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 5 चौकार लगावले. ईशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरला. 


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 49 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा याने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. सर्वाधिक षटकार यासह अनेक विक्रम रोहित शर्माने केले. रोहित शर्माने सर्वच अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने 84 चेंडूमध्ये पाच षटकार आणि 16 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सुत्रे संभाळली. 


विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या जोडीने भारताला वजय मिळवून दिला. विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये अभ्यद्य भागादारी झाली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने नाबाद 55 तर श्रेयस अय्यर याने नाबाद 25 धावांची खेली केली. विराट कोहलीने सहा चौकार लगावले तर अय्यरने एक षटकार आणि एक चौकार मारला. 


अफगाणिस्तानच्यासर्वच गोलंदाजाची धुलाई झाली. राशिद खानचा अपवाद वघलता एकाही गोलंदाजाला विकेट घेतला आली नाही. राशिद खान याने दोन विकेट घेतल्या. 


 


World Cup : विराट-नवीन उल हकचा वाद संपला 


आयपीएल सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले होते. पण आता विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी मैदानात गळाभेट घेत आपल्यातील कटूता संपल्याचे सांगितले. 


विराट कोहली फंलदाजीला आल्यानंतर चाहत्यांनी नवीन उल हक याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी समालोचन करणाऱ्या गौतम गंभीर यानेही प्रतिक्रिया दिली. नवीन आणि विराट यांच्यातील वाद संपलेला आहे. खेळाडूमध्ये मैदानात थोडाफार वाद होतच असतो. सामना झाल्यानंतर या सर्व गोष्टी विसरतात, त्यामुळे प्रेक्षकांनीही खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करताना विचार करायला हवा. 


सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहितच्या नावावर -


विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहेत. दोघांच्या नावावर विश्वचषकात 5 शतके आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार शतके ठोकली आहे. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही चार शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.  


सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर - 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.


रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा - 


रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे.  2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट  कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत