IND vs AFG :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना अतिशय रोमांचक झाला. दोन्ही संघाची धावसंख्या बरोबर झाल्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली. पण सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला.  रवि बिश्नोई याने तीन चेंडूमध्ये दोन फलंदाजांना तंबूत धाडलं.


बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.  पहिल्या सुपरओव्हरमध्ये दोन्ही संघानेही समान धावसंख्या केली त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात आली. भारताने प्रथम फलंदाजी करत 11 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली. भारताने रोमांचक सामन्यात विजय मिळवत मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. 


सुपरओव्हरही टाय झाल्यामुळे आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून रोहित शर्मा आणि रिंकू सिंह मैदानात उतरले होते. तर अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने गोलंदाजाची जबाबदारी घेतली होती. 


0.1 - रोहित शर्माने फरीद अहमद याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. 


0.2 - रोहित शर्माने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले. 


0.3. - रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताने तीन चेंडूमध्ये 11 धावा वसूल केल्या. 


0.4 - मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंह झेलबाद झाला. भारताला 11 धावांवर पहिला धक्का बसला. 


0.5 - संजू सॅमसन याला मोठा फटका मारता आला नाही, विकेटकिपरकडे चेंडू गेल्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा धावबाद झाला.  त्यामुळे अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 12 धावांचे आव्हान मिळाले. 


दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 12 धावांचे आव्हान दिले. भारताकडून रवि बिश्नोई याने गोलंदाजी केली. तर अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि मोहम्मद नबी फलंदाजीसाठी उतरले. 


0.1 - रवि बिश्नोईच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबी याने मोठा फटका माऱण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू रिंकू सिंह याच्या हातात विसावला. अफगाणिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. अफगाणिस्तानला विजयासाठी 5 चेंडूत 12 धावांची गरज.. फलंदाजीसाठी जनत मैदानावर आला. 


0.2- रवि बिश्नोईच्या दुसऱ्या चेंडूवर जनत याने एक धाव घेतली.  अफगाणिस्तानला विजयासाठी 4 चेंडूत 11 धावांची गरज 


03. - गुरबाज याला बाद करत रवि बिश्नोईने भारताला विजय मिळवून दिला.