IND U19 vs ENG U19 Final Live: भारत-इंग्लंड यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND U19 vs ENG U19 Final Live: भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे.

abp majha web team Last Updated: 05 Feb 2022 02:46 PM
भारताचे सलामीवीर तंबूत परत, यश रशिदवर सर्व जबाबदारी

भारताचे सलामीवीर अंगक्रिश आणि हरनूर सिंग तंबूत परतले आहेत. 50 धावांच्या आत भारताचे दोन गडी तंबूत परतले आहेत. आता कर्णधार यश आणि रशीद क्रिजवर आहेत.

भारताला पहिला धक्का

190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. 

भारताला विजयासाठी 190 धावांचे आव्हान

इंग्लंडचा संघ 189 धावांत गारद झाला आहे. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी 190 धावा करायच्या आहेत.

इंग्लंडचे नऊ फलंदाज तंबूत परत

43.4 ओव्हरनंतर इंग्लंडने 185 धावा केल्या असून त्यांचे नऊ गडी तंबूत परतले आहेत.

इंग्लंडचा डाव सावरला 

पडझडीनंतर इंग्लंडच्या फंलदाजांनी डाव सावरला आहे. REW आणि SALES यांनी इंग्लंडला सन्माजनक धावसंखाकडे नेहलं आहे. REW सध्या 84 धावांवर खेळत आहे. 

राज बावाचं चौथं यश, इंग्लंडचा सहावा गडी तंबूत परत

राज बावाने इंग्लंडच्या रेहान अहमद याला बाद करत इंग्लंडला सहावा झटका दिला आहे.

भारताची भेदक गोलंदाजी, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

भारताने आज अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. 50 धावांच्या आतच इंग्लंडचे 5 गडी तंबूत परतले आहेत. राज बावा याने जियॉर्ज बेलला बाद केलं आहे.

इग्लंडला चौथा झटका, राज बावाच्या गोलंदाजीवर विल्यम लक्स्टन बाद

इंग्लंडच्या संघाला चौथा झटका लागलाय. राज बावाच्या गोलंदाजीवर विल्यम लक्स्टननं त्याची विकेट्स गमावली आहे. इंग्लंडचा स्कोर- 47/4 (12.5)

भारताची चांगली सुरुवात, पाच षटकाच्या आत इंग्लंडचे दोन खेळाडू बाद

इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतानं चांगली सुरुवात केलीय. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडचे 5 षटकाच्या दोन खेळाडू बाद झाले आहेत.

इंग्लंडचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पार्श्वभूमी

IND U19 vs ENG U19 Final Live: भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर (Sir Vivian Richards Stadium) शनिवारी महाअंतिम लढत होणार आहे. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना जिंकून भारत इतिहास रचणार आहे. परंतु, यासाठी  इंग्लंडचा अडथळा ओलांडावा लागेल. या स्पर्धेत दोन्ही संघानी चांगली कामगिरी बजावली आहे.


अंडर-19 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानं एकही सामना गमावला नाही. या दोन्ही संघांनी आपापल्या गटातील सर्व 3 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन्ही संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. 


कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या (5 फेब्रुवारी) सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदान, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध भाषिक वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल. यासाठी तुम्हाला या अॅपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.


संघ


भारत: यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार, आराध्य यादव, सिद्धार्थ यादव, मानव प्रकाश, अनीश्वर गौतम, गर्व सांगवान.



इंग्लंड: टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अ‍ॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन, नॅथन बर्नवेल, जेम्स कोल्स, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.