Ayush Mhatre World Record : भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 कसोटी मालिका नुकतीच संपली. दोन्ही कसोटी सामने अनिर्णीत राहिली, पण या मालिकेत भारताचा कर्णधार आणि अवघ्या 18 वर्षांचा आयुष म्हात्रे याने चेम्सफोर्ड येथे खेळलेल्या दुसऱ्या कसोटीत ठोकले. त्याची वादळी शतकी खेळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या खेळीमुळे त्याच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही नोंदवला गेला. दुसरीकडे, भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी मात्र दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला.
आयुष म्हात्रेचा वर्ल्ड रेकॉर्ड
चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळलेला आणि सध्या भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार असलेला आयुष म्हात्रे दुसऱ्या कसोटीत 355 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अभिज्ञान कुंदूसह त्याने केवळ 77 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली.
64 चेंडूत आयुषने शतक पूर्ण करताच तो यूथ कसोटीत सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉर्ज बेलच्या नावावर होता, ज्याने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 88 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आयुषच्या या खेळीमुळे त्याच्या नावावर अंडर-19 कसोटीत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद शतकी खेळी नोंदवण्यात आली आहे.
आयुष म्हात्रेची मालिकेत चमकदार कामगिरी, 328 चेंडूत ठोकल्या 340 धावा
आयुषने इंग्लंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या 4 डावांमध्ये एकूण 328 चेंडूंचा सामना केला आणि 340 धावा केल्या. या दरम्यान, आयुषची सरासरी 85.00 होती तर त्याचा स्ट्राइक रेट 103.65 होता. 4 डावांमध्ये त्याने 2 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आणि त्याचा सर्वोत्तम धावसंख्या 126 धावा होत्या, जो त्याने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात खेळला. आयुषने 4 डावांमध्ये 102, 32, 80 आणि 126 धावा केल्या. या 4 डावांमध्ये त्याने 9 षटकार आणि 46 चौकारही मारले.
वैभव सूर्यवंशी मात्र पुन्हा फेल!
इंग्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विहान मल्होत्रा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने या काळात 4 डावात 277 धावा केल्या आणि एक शतक आणि 2 अर्धशतके केली. वैभवने या कसोटी मालिकेतील 4 डावात निराशा केली आणि त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 90 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 56 धावा होती.
हे ही वाचा -