India to tour England 2026 schedule : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्याचबरोबर, भारताचा इंग्लंड दौरा येथेच थांबणार नाही. टीम इंडिया पुढील वर्षी पुन्हा एकदा इंग्लंडला येणार आहे. पुढच्या वर्षी जुलै 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामन्यांची आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. ही माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज गुरुवार 24 जुलै रोजी दिली आहे.

इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया खेळणार टी-20, वनडे मालिका

टीम इंडियाला पुढील वर्षी जुलैमध्ये पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 1 जुलै ते 11 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका खेळली जाईल. या मालिकेत पाच सामने खेळले जातील. त्याच वेळी, यानंतर लगेचच 14 जुलै ते 19 जुलै दरम्यान तीन एकदिवसीय सामने देखील खेळले जातील. पुढील वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका 

  • पहिला सामना - 1 जुलै; बँक होम रिव्हरसाईड, डरहम
  • दुसरा सामना - 4 जुलै; ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • तिसरा सामना - 7 जुलै; ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • चौथा सामना - 9 जुलै; सीट युनिक स्टेडियम, ब्रिस्टल
  • पाचवा सामना - 11 जुलै; युटिलिटा बाउल, साउथहॅम्प्टन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका

  • पहिला सामना - 14 जुलै; एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • दुसरा सामना - 16 जुलै; सोफिया गार्डन्स, कार्डिफ
  • तिसरा सामना - 19 जुलै; लॉर्ड्स, लंडन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. आज, 24 जुलै रोजी, टीम इंडिया मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळत आहे. आतापर्यंत भारत या मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. 2025 मध्ये भारताचा दौरा 20 जून रोजी सुरू झाला. या दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.

भारतीय महिला संघ पुढील वर्षी इंग्लंडला जाणार  भारतीय महिला क्रिकेट संघ मे-जून 2026 मध्ये इंग्लंडचा सामना करणार आहे. भारतीय महिला संघ यजमान इंग्लंड संघाविरुद्ध तीन टी-20 सामने आणि एक कसोटी सामना खेळेल. या सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

  • 28 मे 2026 : पहिला टी-20 सामना, चेम्सफोर्ड, रात्री 11.00 वाजता
  • 30 मे 2026 : दुसरा टी-20 सामना, ब्रिस्टल, या सामन्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही
  • 2 जून 2026 : तिसरा टी-20  सामना, टॉन्टन, रात्री 11.00 वाजता
  • 10 जुलैपासून कसोटी सामना: लॉर्ड्स (लंडन), दुपारी 3.30 वाजता

हे ही वाचा -

BCCI on Rishabh Pant Update : पायला दुखापत, पण जिद्दीने पेटला ऋषभ पंत! भळभळती जखम घेऊन बॅटिंगसाठी मैदानात उतरला