India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका उद्या अर्थात 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे, पण पहिल्या सामन्यापूर्वीच एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. कारण पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचा धोका असल्याचं समोर येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकातील पराभवानंतर एक नवी सुरुवात करणार आहे, मात्र त्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांची पावसामुळे निराशा होऊ शकते. पहिल्या सामन्यावेळी सामना होणाऱ्या वेलिंग्टन येथील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया...

हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, उद्या ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. दुपारनंतर पाऊस आणि वारा वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळे तापमानही 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. त्यामुळे सामन्यावेळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. 

कधी, कुठे पाहल सामना?

भारतीय वेळेनुसार हा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

कसं आहे टी-20 मालिकेच वेळापत्रक?

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर वेलिंग्टन
दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर माउंट मॉन्गनुई
तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर नॅपियर

हे देखील वाचा-