IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
सामना होणाऱ्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमची खेळपट्टी नवीकोरी असल्याने एक रंगतदार लढत होऊ शकते. बांगलादेशातील इतर कोणत्याही विकेटप्रमाणेच, ही खेळपट्टी देखील फिरकीपटूंना जास्त फायदा देणारी आहे. तर फलंदाजांना त्यांची लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या मैदानावर वनडेतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 216 धावांची आहे, यावरून एक लो स्कोरिंग मॅच आज होऊ शकते.
कसा आहे आजवरचा इतिहास?
भारतीय संघ 38 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं (Team India) पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 36 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 7 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
कसा आहे भारतीय संघ?
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
कुठे होणार लाईव्ह स्ट्रिमिंग
भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 11.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-