WTC 2025 Points Table Pakistan vs England 2nd Test : इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना मुलतान स्टेडियमवर खेळला गेला. जो पाकिस्तानने 152 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाकिस्तानच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही बदल दिसून आले. पाकिस्तानला थोडा फायदा झाला आहे, तर इंग्लंडला पराभवासह नुकसान सहन करावे लागले आहे.




पहिल्या सामन्यातील पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट झाली होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने आता एक स्थानवर झेप घेतली आहे. आता पाकिस्तानचा संघ 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, इंग्लंड अजूनही चौथ्या स्थानावर आहे, परंतु संघाच्या विजयाची टक्केवारी कमी झाली आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडची विजयाची टक्केवारी 45.59 होती, जी आता 43.06 झाली आहे.




भारत पहिल्या स्थानावर


भारतीय संघ सध्या न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. याआधी टीम इंडियाने बांगलादेशचा कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि टीमची विजयाची टक्केवारी 74.24 आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. तर श्रीलंकेचा संघ 55.56 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.




साजिद खान ठरला सामनावीर 


साजिद खानने दुसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात साजिद खानने 9 विकेट घेतल्या. साजिदने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 2 बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून 24 धावा केल्या.


हे ही वाचा -


Ind vs Nz 1st Test Day-3 : भारताचा पलटवार! दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली आऊट, जाणून घ्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?


IND vs NZ : नशीबच फुटकं! रोहित शर्मा अशाप्रकारे आऊट झाला की विश्वासच बसेना, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल