ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघ (Team India) 8 ऑक्टोबरपासून चेन्नई येथे विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. एम ए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. पण कांगारुंविरोधात भारतीय संघाचे (IND vs AUS) कॉम्बिनेशन कसे असेल.. याबाबतची चर्चा रंगली आहे. भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूसह मैदानात उतरणार.. किती फिरकी गोलंदाजांना संधी देणार... फलंदाज कोण? यासारखे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. 


विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात आठ ऑक्टोबर रोजी भारताचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यापुढे अडचणी वाढल्या आहेत.  ही अडचण आठव्या क्रमांकाच्या खेळाडूवरुन असल्याचे समजतेय. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे, अशात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार का? यावरुनच रोहित शर्मापुढे पेच उभा राहिला आहे.  त्याशिवाय फॉर्मात असलेल्या शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे गिलच्या खेळण्यावर साशंकता आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशन सलामीला येईल. 


आर. अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणं, कठीण आहे. पण चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघात एकापेक्षा जास्त डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात अश्विन भेदक ठरतो, त्यामुळे चेन्नईमध्ये आर. अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते, असा तर्क लावला जातोय. पण अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिल्यास शार्दूल ठाकूर अथवा मोहम्मद शामी यांना बाहेर बसावे लागू शकते. 


चेन्नईची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान माऱ्याला मदत करते. त्यात तिथं दव हा महत्वाचा घटक ठरणार आहे. मोहम्मद शामी नवा चेंडू स्विंग करु शकतो. सुरुवातीलाच शामी ऑस्ट्रेलियाला धक्के देण्यात माहीर आहे. मागील वर्षभरात मोहम्मद शामीने पहिल्या दहा षटकात 15 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. सिराज आणि बुमराह यांचाही रेकॉर्ड चांगला आहे. अशा स्थितीत भारत तीन फिरकी गोलंदाजासह उतरणार का ? मोहम्मद शामी आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार.. की दोन्ही खेळाडू प्लेईंग 11 च्या बाहेर बसतील, असा तर्कवितर्क सुरु आहे.



रोहित शर्मा आणि भारतीय खेळाडू चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. खेळाडूंनी सरावही सुरु केला आहे. सरावानंतरच रोहित शर्मा प्लेईंग 11 अथवा टीम कॉम्बिनेशनचा विचार करेल. 


हार्दिक तिसरा वेगवान गोलंदाज - 


हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव याच्याशिवाय अन्य एका फिरकी गोलंदाजाला संधी देता येऊ शकते. 


भारताची संभाव्य प्लेईंग 11 - 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, अश्विन/शार्दूल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह