इंग्लंडमधील आगामी विश्वचषक हा आजवरचा सर्वात आव्हानात्मक विश्वचषक असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली आहे. येत्या 30 मे ते 14 जुलै या कालावधीत या विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. कसोटी दर्जा लाभलेल्या बारापैकी केवळ दहा संघांचा या विश्वचषकात सहभाग असून, त्या दहाही संघांना प्राथमिक साखळीत एकमेकांशी एकेकदा खेळायचं आहे. 1992 सालचा ऑस्ट्रेलियातला विश्वचषक याच फॉरमॅटनं खेळवण्यात आला होता.