मुंबई : विश्वचषकात भरतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. त्याने 2.4 षटकात आठ धावा केल्या होत्या. त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने विश्वचषकातील पदार्पणाच्या पहिल्याच सामनच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने इमाम उल हकला पायचीत करुन माघारी धाडलं.
अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल. तसंच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली.
"भुवनेश्वरची दुखापत किरकोळ आहे. फूट मार्कवरुन पाय घसरल्यामुळे ही दुखापत झाली. सध्याच्या घडीला दुखापत फार गंभीर वाटत नाही. आम्ही त्याला थोडा वेळ देणार आहे. आशा आहे की पुढच्या काही सामन्यांआधी तो फिट होईल. जर नाहीच झाला, तर तीन सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही," असं विराट कोहली म्हणाला.
संबंधित बातम्या
World Cup 2019 | टीम इंडियाची विश्वचषकातील विजयी परंपरा कायम, प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारली धूळ
World Cup 2019 | सुपरफास्ट विराट, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', 'या' विक्रमाला गवसणी
World Cup 2019 | रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम