Shoaib Akhtar On India Womens Team WC Final 2025: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या स्पर्धेतील (ICC Womens World Cup 2025) अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव (Ind W vs SA W) केला. या विजयासह भारताने महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नाव कोरले. भारतीय महिला खेळाडूंच्या या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रमीझ राजाने (Rameez Raja) भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

भारतीय महिला संघाच्या विजयाबद्दल माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, या विजयाबद्दल भारताचे अभिनंदन. भारतीय मुलींनी चांगला खेळ केला आणि खरोखरच त्या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी लोकांना आनंद साजरा करण्यासाठी काहीतरी दिले. टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी देखील खूप चांगली होती. यामुळे भारताचा संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. टीम इंडियाने व्यापक विजय मिळवला याचा मला आनंद आहे, असं शोएब अख्तरने सांगितले. (Shoaib Akhter On India Womens Team WC Final 2025)

रमीझ राजा काय म्हणाला? (Pakistan On India Womens Team)

पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा एका व्हिडीओमध्ये म्हणाला, भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो इतका उत्तम संघ का आहे. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली, असं रमीझ राजाने सांगितले. 

भारत-दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना कसा राहिला? (India W vs South Africa W Final Match)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या. भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अ‍ॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली. 

संबंधित बातमी:

IND vs SA Womens World Cup Final 2025 Prize Money: ICC कडून दक्षिण अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!

INDW vs SAW World Cup Final 2025 Rohit Sharma: जो खो गया मैं उस को भुलाता चला गया...; भारताने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा भावूक, आकाशाकडे पाहिलं अन्..., Video पाहून भारतीयांच्या डोळ्यात पाणी!