ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) स्पर्धा 2 जूनपासून सुरु झाली आहे. भारतीय संघाने (Indian Cricket Team) अमेरिकेत सराव सुरु केला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध एक सराव सामना खेळला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. मॅथ्यू हेडनने निवडलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. 


विराट कोहली सलामीवीर, तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर-


ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने पुन्हा एकदा विराट कोहलीला सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला सलामीवीर म्हणून संधी द्यावी. जर विराट कोहलीला सलामीला खेळवणार नसाल, तर त्याला संघात स्थान देऊ नये, असं मत मॅथ्यू हेडनने मांडलं आहे. संघात डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन असणे आवश्यक आहे. संघात सलग पाच फलंदाज उजव्या हाताचे असू शकत नाही.  


मॅथ्यू हेडनच्या प्लेइंग इलेव्हन कोणाचा समावेश- 


मॅथ्यू हेडनने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांचा सलामीवीर म्हणून समावेश केला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत पाचव्या, हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर आहे. हेडनने शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे.


विराट कोहलीच्या आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा-


विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएल 2024 च्या 15 सामन्यांमध्ये 154.70 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या, ज्यामध्ये पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. आयपीएलच्या या मोसमातील कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे 11
 नाबाद धावा, त्याने 62 चौकार आणि 38 षटकार ठोकले.


टी-20 विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार-


वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. 


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Full Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर