ICC ODI World Cup 2023, Virat Kohli : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दिमाखात सुरुवात केली. भारताने सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी केली.  विराट कोहली आणि राहुल यांनी 165 धावांची भागिदारी करत विजय हिसकावून आणला. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारताची फिल्डिंगही दमदार होती. विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन यांनी चांगली फिल्डिंग केली. विराट कोहलीला जबराट फिल्डिंगमुळे गोल्ड मेडल देण्यात आले.


फिल्डंग कोच टी दिलीप यांनी भारतीय संघाच्या फिल्डिंगचे कौतुक केले. विराट कोहली, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फिल्डिंगचे त्यांनी कौतुक केले. टी दिलीप यांनी बीसीसीआयच्या वतीने कोहलीला विशेष गोल्ड मेडल दिले. याचा व्हिडीओ बीसीसीआयने bcci.tv वर पोस्ट केला आहे. याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. या व्हिडीमध्ये भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये हसताना दिसत आहेत. त्यानंतर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी बीसीसीआयने सुरू केलेल्या नवीन गोष्टीबद्दल सर्वांना माहिती दिली. खरे तर या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला विशेष पदक देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.


टी दिलीप यांच्या मते कोहलीची फिल्डिंग वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे त्यांनी गोल्ड देऊन त्याचे कौतुक केले.  कोहलीला पदक मिळताच तो ते घेण्यासाठी उत्सुकतेने पुढे सरसावला. यानंतर विराटने हात वर करून आनंद साजरा केला आणि मग पदक दातात पकडत पोझ दिली.






विराट विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू - 


विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत. 


विराट कोहलीने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कोण कोणते विक्रम केले ?


केएल राहुल आणि विराट कोहली यांची दीडशतकी भागिदारी झाली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागिदारी होय. 


एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या नावावर जमा झाल्या आहेत. 270 डावात विराट कोहलीचा 114 वा 50 प्लस स्कोर होय. 









विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा (नॉन ओपनर) करणारा फलंदाज झाला आहे. 


आयसीसीच्या व्हॉइट बॉल स्पर्धेत भारातकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 24 डावात 2720 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने सचिनचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरने 58 डावात 2719 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 64 डावात 2422 धावा केल्या आहेत. 


वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे. विराट कोहलीच्या नावावर जवळपास 1100 धावांची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकर 2278 धावांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. सौरव गांगुली 1006 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.