ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा सामना दिल्लीमध्ये सुरु आहे. अफागणिस्तान आणि भारत (IND vs AFG) यांच्यामध्ये ही लढत सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघामध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. आर. अश्विन (R Ashwin याच्या जागी शार्दूल ठाकूर (Shardul) याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. सामन्याआधी मोहम्मद शामी (mohammed shami) याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अफगाणिस्तानविरोधात मोहम्मद शामीचा रेकॉर्ड चांगला आहे. 2019 च्या विश्वचषकात शामीने हॅट्ट्रिक घेतली होती. त्यामुळे आज शामीला संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण शार्दूल ठाकूरसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. टीम मॅनेजमेंटच्या यानिर्णायानंतर भारतीय चाहत्यांना राग अनावर आला. नेटकऱ्यांनी भारतीय संघ आणि बीसीसीआयवर निशाणा साधला. 


2019 च्या विश्वचषकात मोहम्मद शामी याने भेदक मारा केला होता. अफगाणिस्तानविरोधात शामीने हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. माजी भारतीय गोलंदाज चेतन शर्मा यांच्यानंतर विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा शामी दुसरा गोलंदाज आहे. शामीने ही हॅट्ट्रिक अफगाणिस्तानविरोधात घेतली होती. शामी संघात असता तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढला असता. आजच्या सामन्यात शामीला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल, अशी आशा होती. पण टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्मा यांनी शार्दूल ठाकूरला संधी दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. 


शार्दूलला संधी - 


भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. दिल्लीच्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फिल्डिंगसाठी उतरावे लागले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला. शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले तर अश्विनला आराम दिला. त्यानंतर मोहम्मद शामीच्या चाहत्यांचा राग अनावर आला. चाहत्यांनी रोहित शर्मासह टीम इंडियावर निशाणा साधला.  





























भारताची प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज









रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी.