ICC ODI Rankings: साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच वनडेत विराट कोहलीच्या बॅटनं अशी धडाकेबाज कामगिरी केली की, चाहत्यांना ‘विंटेज कोहली’ पाहिल्याचा आनंद मिळाला. विराटच्या शानदार शतकाचा प्रभाव केवळ मैदानापुरता मर्यादित न राहता थेट ICC रँकिंगवरही दिसून आला आहे. साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीच्या ODI रँकिंगमध्ये मोठी झेप बघायला मिळाली आहे. आयसीसीने 30 नोव्हेंबर 2025 रोजी पुरुष एकदिवसीय फलंदाजीची नवीन क्रमवारी जाहीर केली. यात विराटने टॉप-5 मध्ये शानदार पुनरागमन केले आहे.

Continues below advertisement

Rohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा एकदा नंबर 1 फलंदाज 

ताज्या क्रमवारीनुसार, रोहित शर्मा नंबर 1 एकदिवसीय फलंदाज राहिला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 783 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितचे सातत्य आणि मोठ्या सामन्यांमधील कामगिरी हे त्याला नंबर 1 स्थानावर पुन्हा निवडण्याचे एक प्रमुख कारण ठरले आहे.

Daryl Mitchell: डॅरिल मिशेल दुसऱ्या क्रमांकावर 

न्यूझीलंडचा स्टार डॅरिल मिशेल 766 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तो या वर्षी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला क्राइस्टचर्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेले 782 गुण त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आहेत.

Continues below advertisement

Ibrahim Zadran: इब्राहिम जदरान तिसऱ्या क्रमांकावर 

अफगाणिस्तानचा तरुण फलंदाज इब्राहिम जदरान 764 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ही त्याच्या करिअरची सर्वोत्तम रेटिंग आहे. गेल्या दोन वर्षांत जदरान अफगाणिस्तानसाठी सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उभा राहिला आहे.

Virat Kolhi & Shubman Gill: विराट कोहली चौथ्या क्रमांकावर, गिल पाचव्या स्थानी  

भारताचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या रँकिंगमध्ये सर्वात मोठा बदल दिसून आला आहे. शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीच्या रँकिंगमध्ये +1 ची झेप लागली असून ते आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर शुभमन गिल एका स्थानाचा तोटा सहन करत आता पाचव्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. विराटची करिअर-बेस्ट रेटिंग अद्यापही 909 आहे, जी त्याने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवली होती. शतकानंतर विराटच्या धमाकेदार फॉर्मला पाहता आगामी सामन्यांमध्ये तो टॉप-3 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ICC ODI Rankings: ICC वनडे रँकिंग 

1. रोहित शर्मा (भारत) – 783 रेटिंग

2. डैरिल मिशेल (न्यूझीलंड) – 766 रेटिंग

3. इब्राहिम जदरान (अफगाणिस्तान) – 764 रेटिंग

4. विराट कोहली (भारत) – 751 रेटिंग

5. शुभमन गिल (भारत) – 738 रेटिंग

आणखी वाचा 

IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव