ICC Champions Trophy 2025 Group A Points Table : पाकिस्तानने आयोजित केलेल्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पण स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. खरंतर, स्पर्धेचा उद्घाटन सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथील राष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानकडून खूपच खराब कामगिरी दिसून आली, ज्यामुळे त्यांना 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंड गट अ मध्ये टेबल टॉपर झाली आहे. त्यासोबतच त्यांचा नेट रन रेट +1.200 आहे. तर दुसरीकडे या पराभवामुळे यजमान देशाला उपांत्य फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. आता, त्यांना पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान अडचणीत!
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 8 संघांमध्ये खेळवली जात आहे. पाकिस्तान संघ भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात आहे. त्याच वेळी, गट टप्प्यात, त्यांना या तीन संघांविरुद्ध 1-1 सामने खेळावे लागतील. म्हणजेच आता गट टप्प्यात फक्त 2 सामने बाकी आहेत. पाकिस्तानचा पुढील सामना 23 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध आहे आणि त्यानंतर त्यांचा सामना बांगलादेशशी होईल. जर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर, हे दोन्ही सामने त्यांच्यासाठी करो या मरो अशा स्थितीत असतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि नेट रन रेट पण सुधारावा लागेल.
खरं तर, कोणत्याही संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 3 पैकी किमान 2 सामने जिंकावे लागतात. अशा परिस्थितीत, जर पाकिस्तान संघ या दोन सामन्यांपैकी एकही सामना गमावला. तर तो स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडेल. जर त्यांना गट टप्प्यात फक्त एकच सामना जिंकता आला, तर त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
भारत आणि पाकिस्तान संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये 2 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. पण या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याचा अर्थ असा की, जर त्यांना उपांत्य फेरीसाठी त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर यावेळी त्यांना दुबईत काय तरी चमत्कार करावा लागेल.
हे ही वाचा -