Pakistan T20 World Cup Super-8 Scenario : भारताविरुद्ध 61 धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे संकट ओढवले आहे. ग्रुप A च्या गुणतालिकेत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर घसरला असून सुपर आठमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य झाले आहे. दुसरीकडे भारताने सलग तीन विजयांसह सहा गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले असून सुपर आठमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे भारताचा अजून एक सामना बाकी आहे.
भारताचा पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळ करत 61 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तानचा डाव अवघ्या 18 षटकांत 114 धावांवर आटोपला. हा विजय भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा ठरला. याआधी 2012 मधील 11 धावांच्या विजयाचा विक्रम होता, तब्बल 14 वर्षांनंतर टीम इंडियाने तो विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.
भारताने हरवलं, पण नशिबाची साथ
पाकिस्तानचा पराभव इतका मोठा होता की नेट रनरेटवर त्यांना फटका बसला आणि ते अमेरिकेपेक्षा खाली घसरले. पाकिस्तान 3 सामने, 2 विजय, 1 पराभव, 4 गुणांसह तिसऱ्या स्थान गेले. तर अमेरिका 4 सामने, 2 विजय, 2 पराभव, 4 गुणांसह दुसऱ्या स्थान आहेत सुपर आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.
नामिबिया रचणार इतिहास?
- पाकिस्तानचा अंतिम सामना 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. त्याच दिवशी भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने येणार आहेत.
- सध्याच्या समीकरणानुसार ग्रुप A मधून भारतासोबत सुपर आठमध्ये पोहोचणारी दुसरी टीम अमेरिका किंवा पाकिस्तान यांपैकी एक असेल.
- पाकिस्तान जिंकला तर त्यांचे 6 गुण होतील आणि अमेरिका बाहेर पडेल.
- पाकिस्तान हरला तर तो 4 गुणांवरच थांबेल आणि त्यांचा प्रवास ग्रुप टप्प्यातच संपेल.
- सामना पावसामुळे रद्द झाल्यासही पाकिस्तान पुढील फेरीत जाऊ शकतो.
- नेदरलँड्स जिंकले तर त्यांचेही 4 गुण होतील, त्यामुळे नेट रनरेट निर्णायक ठरेल.
हे ही वाचा -
