India A vs Bangladesh A ACC Mens Emerging Teams Asia Cup 2023 : इमर्जिंग आशिया कप 2023 च्या उपांत्यफेरीत भारताच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशचा अ चा पराभव केला. बांगलादेश अ संघाचा पराभव करत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा 51 धावांनी पराभव केला. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरदाखल बांगलादेशचा संघ 160 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघ आता फायनलमध्ये पोहचलाय. या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे खेळाडू भडले... भारताने फायनलमध्ये प्रवेश मिळाला पण उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळाडूंचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. आता यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने दमदार सुरुवात केली. पण निशांत सिंधूच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. १०० धावांत बांगलादेशने पाच फलंदाज गमावले. त्यावेळी अनुभवी सौम्य सरकार मैदानात उतरला होता. सौम्य मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. सौम्य सरकार स्लीपमध्ये उभ्या असलेल्या निकिन जोस याच्या हातून झेलबाद झाला होता. सौम्यच्या या विकेटनंतर भारतीय संघाचा खेळाडू हर्षित राणा (Harshit Rana) हा जास्तच आक्रमक झाला होता.  हर्षित राणा आणि सौम्य सरकार यांच्यात बाचाबाची पाहायला मिळते. मात्र, पंच आणि संघसहकारी मध्यस्थी करत प्रकरण मिटवले. भारतीय संघ फलंदाजी करताना सौम्य सरकारने भारतीय फलंदाज बाद झाल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्यामुळेच हर्षित राणा यानेही सौम्य सरकार बाद झाल्यानंतर जल्लोष केला. त्यावेळी दोन्ही खेळाडूमध्ये बाचाबाची झाली. याचा बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 






भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना  49.1 षटकात 211 धावांपर्यंत मजल मारली.  यश धुल याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. यश धुल याने 85 चेंडूत  66 धावांची खेळी केली. या खेळीत यश धुल याने सहा चौकार लगावले.  अभिषेक शर्मा याने 63 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. सलामी फलंदाज साई सुदर्शन याने 24 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 21 धावांची खेळी केली.  रियान पराग याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला फक्त 12 धावा करता आल्या.  निकिन जोस याने 17 धावांचे योगदान दिले.   मानव सुतार याने 21 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये तीन चौकार लगावले. 


भारताने दिलेल्या २१२ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना १६० धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेश संघाने तनजीम हसन याने 51 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने 56 चेंडूत 8 चौकार लगावले.  मोहम्मद नईम याने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार सैफ हसन याने 22 धावांची खेळी केली. हसन जॉय याने 20 धावा जोडल्या. त्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी पाकिस्तानसोबत लढाई होणार आहे.