नवी दिल्ली :आयपीएल संपल्यानंतर पुढील एक महिना क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. हे दोन्ही देश या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. आयसीसीनं संघ जाहीर करण्यासाठी 1 मे ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. भारतीय क्रिकेट टीमची देखील लवकरच घोषणा होऊ शकते. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. अजित आगरकर आणि इतर निवड समितीच्या सदस्यांची बैठक लवकरच होऊ शकते. 


अजित आगरकर, राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि निवड समितीचे इतर सदस्य यांच्या बैठकीत भारतीय खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीला देखील महत्त्व दिलं जाण्याची शक्यता आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं देखील आयपीएलधील कामगिरीच्या आधारे टीम निवडली जाईल असं म्हटलं होतं. टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या तयारी करण्यासाठी वेळ मिळालेल नाही. त्यामुळं आयपीएलमधील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे, असं राहुल द्रविड म्हणाला. 


हार्दिक पांड्या अन् केएल.राहुलला एक गोष्ट महागात पडणार?


टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात संधी कोणाला मिळेल यासंदर्भात तर्क वितर्क सुरु आहेत. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि लखनौ सुपर जाएंटसचा कॅप्टन केएल राहुल हे दोघेही वर्ल्ड कपच्या शर्यतीत आहेत. मात्र, दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे ती फारशी समाधनकारक नाही. हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला यंदाच्या आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. त्यांचं स्ट्राईक रेट कमी असल्यानं वर्ल्ड कप टीममधून त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. 



हार्दिक पांड्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 मॅचमध्ये 146.87 च्या स्ट्राईक रेटनं 141 धावा केल्या आहेत. हार्दिक ज्या प्रमाणं बॅटिंगमध्ये अयशस्वी ठरला आहे. बॉलिंगमध्ये देखील हार्दिक पांड्या अपयशी ठरला आहे. 11 च्या इकोनॉमीनं 4 विकेट घेतल्य आहेत. दुसरीकडे केएल. राहुलनं 143 च्या स्ट्राईक रेटनं  286 धावा केल्या आहेत. 


वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. त्या संघांना चार गटांमध्ये विभागलं जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून हाय व्होल्टेज लढत 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. 



ग्रुप ए :भारत, पाकिस्तान, आयरलँड, कॅनडा, यूएसए


ग्रुप बी :  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलंड, ओमान


ग्रुप सी : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी


ग्रुप डी :  दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँडस, नेपाळ


संबंधित बातम्या :



RR vs MI Weather Report: मुंबईकडे राजस्थानचा हिशोब चुकता करण्याची संधी, पाऊस खेळ बिघडवणार का? वाचा वेदर रिपोर्ट