Harbhajan Singh on Lalit Modi : क्रिकेटमधल्या सर्वात वादग्रस्त क्षणांपैकी एक असलेला ‘स्लॅप-गेट’चा व्हिडिओ अचानक समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या घटनेत 2008 च्या आयपीएलदरम्यान हरभजन सिंगने एस. श्रीसंतला कानाखाली मारली होती. त्या हंगामातला आणि एकूणच क्रिकेट इतिहासातला तो एक लक्षात राहणारा प्रसंग ठरला होता. पण यावेळी हा व्हिडिओ लीक करणारे माजी IPL चेअरमन ललित मोदी होते आणि यावर हरभजन सिंगने अखेरची मौनव्रत सोडले आहे.
भज्जीने एका पेजशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितलं, "18 वर्ष जुना व्हिडिओ बाहेर काढणं चुकीचं आहे. हे एखाद्या स्वार्थी हेतूनं केलं गेलंय. लोक ही गोष्ट विसरून गेले होते, पण आता पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत." त्यानं हेही सांगितलं की, तो प्रसंग मागे टाकून तो पुढं गेलेला आहे, आणि अशा प्रकारे वारंवार मुद्दा काढणं म्हणजे फक्त गैरसोयीचं कारण ठरणार आहे.
हरभजन अनेकदा मान्य करत आला आहे की त्या घटनेबद्दल त्याला खूप लाज वाटते. श्रीसंतला कानाखाली मारल्याबद्दल त्याने अनेक वेळा माफीही मागितली आहे. आता दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे. पण ललित मोदींनी 18 वर्ष जुना व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत ताजा झाला.
हरभजन म्हणाला की, "जे घडलं त्याबद्दल मला वाईट वाटतं. आम्ही खेळत होतो आणि त्या वेळी डोक्यात खूप गोष्टी चालू होत्या. चूक झाली आणि त्याचं दुःख आहे. हो, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती एक दुर्दैवी घटना होती आणि मी अनेकदा सांगितलंय की माझ्याकडून चूक झाली. माणसाकडून चुका होतात आणि माझ्याकडूनही झाली. मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आहे की जर माझ्याकडून पुन्हा कधी चूक झाली तर त्यांनी मला माफ करावं. चुका फक्त माणसाकडूनच होतात."
लक्षात घेण्यासारखं म्हणजे, आयपीएल 2008 मधल्या ‘स्लॅपगेट’ वादानंतर हरभजनला 11 सामन्यांसाठी निलंबित केलं होतं. दुसरीकडे, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिने या व्हिडिओ लीकवर जोरदार प्रतिक्रिया दिली. तर त्यावेळचे मॅच रिफरी फारुख इंजिनिअर यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटलं, "मी ही घटना खूप जबाबदारीने आणि गुप्ततेने हाताळली होती. मला कधीच वाटलं नव्हतं की हा व्हिडिओ बाहेर येईल."
दरम्यान, वरिष्ठ क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांनीही मत मांडत सांगितलं, "त्या वेळी बीसीसीआय आणि आयपीएलने जाणीवपूर्वक हा व्हिडिओ लपवला होता, कारण त्यामुळे स्पर्धेची आणि खेळाडूंची प्रतिमा खराब होऊ शकली असती.
हे ही वाचा -