Women's World Cup 2025 Prize Money :महिला वर्ल्ड कप 2025 ची सुरुवात 30 सप्टेंबरपासून होत आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेत प्राईज मनी तब्बल 297 टक्क्यांनी वाढवली आहे. आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी महिला वर्ल्ड कपसाठी 13.88 मिलियन डॉलर्स (सुमारे 122 कोटी रुपये) इनामी रक्कम जाहीर केली आहे. आयसीसी प्रमुख पद सांभाळताच जय शाह यांनी महिला क्रिकेटला नवा उंचीवर देण्यासाठी हा मोठा टप्पा पार केला आहे.

महिला वर्ल्ड कपची प्राईज मनी (Women's World Cup 2025 Prize Money)

  • विजेता संघ – 4.48 मिलियन डॉलर्स (सुमारे 40 कोटी रुपये)
  • उपविजेता संघ – 2.24 मिलियन डॉलर्स (सुमारे 20 कोटी रुपये)
  • सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ – प्रत्येकी सुमारे 10 कोटी रुपये
  • पाचवा व सहावा क्रमांक – प्रत्येकी 6 कोटी रुपये
  • सातवा व आठवा क्रमांक – प्रत्येकी 2.5 कोटी रुपये
  • प्रत्येक संघाला किमान हमी रक्कम – 2 कोटी 50 लाख रुपये

यंदाच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक संघावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार असून महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आर्थिक टप्पा मानला जात आहे.

आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक

मंगळवार, 30 सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरूबुधवार, 1 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - इंदूरगुरुवार, 2 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान - कोलंबोशुक्रवार, 3 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - बंगळुरूशनिवार, 4 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - कोलंबोरविवार, 5 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान - कोलंबोसोमवार, 6 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - इंदूरमंगळवार, 7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - गुवाहाटीबुधवार, 8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान - कोलंबोगुरुवार, 9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - विशाखापट्टणमशुक्रवार, 10 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणमशनिवार, 11 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - गुवाहाटीरविवार, 12 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विशाखापट्टणमसोमवार, 13 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणममंगळवार, 14 ऑक्टोबर : नवीन झीलंड विरुद्ध श्रीलंका – कोलंबोबुधवार, 15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबोगुरुवार, 16 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणमशुक्रवार, 17 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – कोलंबोशनिवार, 18 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबोरविवार, 19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूरसोमवार, 20 ऑक्टोबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबोमंगळवार, 21 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान – कोलंबोबुधवार, 22 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – इंदूरगुरुवार, 23 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटीशुक्रवार, 24 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबोशनिवार, 25 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – इंदूररविवार, 26 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटीरविवार, 26 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश – बंगळुरू

बुधवार, 29 ऑक्टोबर : उपांत्य सामना 1 – गुवाहाटी/कोलंबोगुरुवार, 30 ऑक्टोबर : उपांत्य सामना 2 – बंगळुरूरविवार, 2 नोव्हेंबर : अंतिम सामना – कोलंबो/बंगळुरू