मुंबई : 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आणि 2011 साली वन डेच्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरणारा 'कॅप्टन कूल' अशी महेंद्रसिंग धोनी (Happy Birthday M.S.Dhoni) याचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही धोनीची चपळाई आणि काटकता तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावते.


महेंद्रसिंग धोनीने 2004 साली क्रिकेटविश्वात पदार्पण केलं होतं. गेले कित्येक दिवस धोनी आपल्याला मैदानावर खेळताना दिसलेला नाही. पण आजही तो जगात सर्वोत्तम मॅच विनर, फिनिशर खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2008 आणि 2009 साली धोनी  ICC ODI Player चा मानकरी ठरला होता. आता आपण महेंद्रसिंग धोनीचे असे 11 विक्रम जाणून घेणार आहोत. जे जगभरात कोणत्याही खेळाडूला मोडणं सहज शक्य नाही.

1. 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीच्यानावावर आतापर्यंत तीन मोठ्या ट्रॉफी आहेत. ज्यात 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. धोनीने भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीच पहिल्या स्थानावर आणले होते.

2. महेंद्रसिंग धोनी जगातील तिसरा सर्वोतकृष्ठ यष्ठीरक्षक आहे, की ज्याने 500 सामन्यांत 780 फलंदाजाना बाद केलं आहे. यात पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि दुसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलक्रिस्ट आहे. ज्याने 998 आणि 905 खेळाडूंना परत पाठविले.

3. सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 178 स्टंपिंग्स केले आहेत.

4. महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी ट्वेन्टीमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक असून त्याच्या नावावर 82 विकेट्स आहेत.

5. धोनीने कारकिर्दीतील टेस्ट आणि वनडे सामन्यातील पहिलं शतक पाकिस्तानच्या विरुद्ध मारलं होतं. ज्यात त्यानो 148 धावांची सुंदर खेळी केली होती.

6. धोनीने वनडे सामन्यात आतापर्यंत एकूण 217 षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे.

7.धोनीच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे . ज्यात त्याने आपल्या 1000 धावा कोणत्याही अर्धशतकाशिवाय धोनीने  केल्या आहेत.

8. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक शतके ठोकली आहेत.

9 धोनीने आतापर्यंत एकूण 9 वेळा गोलंदाजी केली होती. धोनीने पहिली विकेट वेस्ट इंडीज विरुद्ध 2009 मध्ये मिळाली होती.

10. आफ्रो आशियाई चषक स्पर्धेत महेला जयवर्धनेबरोबर केलेली 218 धावांची भागीदारी अद्याप विश्वविक्रमी भागीदारी ठरली आहे.

11. धोनी पहिला अस खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळी आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला.