Happy Birthday Mohammad Shami: भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी आज त्याच्या 32वा वाढदिवस साजरा करतोय. मोहम्मद शामीनं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक विजयात त्याचं मोलाचं योगदान आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला अधिक मजबूत बनवण्यासाठी मोहम्मद शामीनं महत्वाची भूमिका बजावलीय. त्यानं 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करून त्यानं गुजरात टायटन्सच्या संघाला खिताब जिंकण्यास मदत केली होती. मोहम्मद शामीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील टॉप 5 बॉलिंग परफॉर्मंसवर एक नजर टाकुयात.


6/56 (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018)
शमीनं 2018 मध्‍ये पर्थमध्‍ये ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन करत क्रिडाविश्वावर छाप सोडली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं सहा विकेट्स घेतल्या. शामीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघानं गुडघे टेकले. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाला 243 धावांपर्यंत मजर मारता आली. परंतु, या सामन्यात भारताला 146 धावांनी भराभव पत्कारावा लागला, ज्यामुळं मोहम्मद शामीची गोलंदाजी निष्फळ ठरली होती. पण आजही मोहम्मह शामीची ही खेळी चाहत्यांच्या लक्षात आहे.


5/69 (विरुद्ध इंग्लंड, 2019)
इंग्लंडमध्ये 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शामीनं दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध मोहम्मद शामीनं 69 धावा खर्च करून पाच विकेट्स मिळवल्या होत्या. 


3/15 (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2020)
आयपीएलच्या तेराव्या हंगामात मोहम्मद शामीनं त्याची महान गोलंदाजांच्या यादीत गणना का केली जाते? याची जाणीव करून दिली. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यानं 15 धावा देऊन तीन विकेट्स मिळवले होते. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सच्या संघानं मोहम्मद शामीला त्यांच्या संघात सामील करून घेतलं. ज्याचा फायदाही त्यांना झाला. पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला खिताब जिंकून देण्यास मोहम्मद शामीचं मोठं योगदान आहे.


3/15 (विरुद्ध स्कॉटलँड, 2021)
मोहम्मद शामीनं गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. या सामन्यात मोहम्मद शामीनं भेदक गोलंदाजी करत स्कॉटलँडच्या तीन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. ज्यामुळं स्कॉटलँडचा संघांची फलंदाजी ढासाळली आणि संघ केवळ 85 धावांवर गारद झाला. या सामन्यात मोहम्मद शामीनं 15 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या होत्या.


3/31 (विरुद्ध इंग्लड, 2022)
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शमीनं सात षटक टाकत 31 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. भारतीय वेगवान आक्रमणाचा सामना करताना इंग्लिश फलंदाजांनी सहज शरणागती पत्कारली आणि यजमानांचा डाव 110 धावांत संपुष्टात आला. अखेरीस मेन इन ब्लू संघानं 10 गडी राखून हा सामना जिंकला.


हे देखील वाचा-