Happy Birthday Anil Kumble: भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिक कुंबळे आज 52 त्याचा 52वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरू येथे झाला. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळेचं नाव घेतलं जातं. कुंबळेंनी कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. तर, भारताकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्स विक्रमही त्यांच्याच नावावर आहेत. कुंबळेंच्या वाढदिवसाचा दिवशी त्याच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या आणखी काही रंजक विक्रमांवर एक नजर टाकुयात.


कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स
पाकिस्तानविरुद्ध  दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर 1999 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्या अनिल कुंबळेंनी एकाच डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. अशी कामगिरी करणारे अनिल कुंबळे पहिले भारतीय आणि जगातील दुसरे गोलंदाज आहेत. त्यांच्यापू्र्वी इंग्लिश गोलंदाज जिम लेकरनं सर्वात प्रथम कसोटीच्या सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं भारताविरुद्ध गेल्या वर्षी 10 विकेट्स घेऊन खास क्लबमध्ये एन्ट्री केली होती. आतापर्यंत या तिघांनाच कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स घेता आल्या आहेत. 


कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय
अनिल कुंबळेंनी भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या 132 सामन्यात सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत कुंबळे चौथ्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही कुंबळेंनी 271 सामन्यात 337 विकेट्स मिळवल्या आहेत. यादरम्यान त्यांनी दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 


कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणारे गोलंदाज
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रमही कुंबळेंच्या नावावर आहे. कुंबळेंनी कसोटीत 40 हजार 850 चेंडू टाकले आहेत. केवळ मुथय्या मुरलीधरननं (44,039) कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळेंपेक्षा जास्त चेंडू टाकले आहेत. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्यांमध्येही कुंबळेंचं नाव आहे. कुंबळेंनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 35 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.


इतर विक्रम
- कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार 506 धावा
- इंग्लंडविरुद्ध एकमेव शतक
- कसोटीत 2 हजार धावांसह 500 हून अधिक धावा करणारे जगातील दुसरे गोलंदाज


आंतरराष्ट्रीय कारकिर्द
अनिल कुंबळेंनी 123 कसोटी आणि 271 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. कसोटीत कुंबळेंच्या नावावर 619 विकेट्स घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुबंळेंच्या नावावर 337 विकेट्सची नोंद आहे. याशिवाय कुंबळेंनी 42 आयपीएल सामनेही खेळले आहेत.  ज्यात त्यांनी 45 विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-