IND Vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड (INDIA VS England) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी दोन्ही संघांनी आपली तयारी सुरुवात केली आहे. नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असला तरी, इंग्लंड पाहुण्या संघाला कोणतीही सवलत देण्याच्या मनस्थितीत नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी त्या खेळपट्टीबाबत पिच क्युरेटरकडून विशेष मागणी केली आहे.

इंग्लंडमध्ये पोहचताच गौतम गंभीरची डिमांड 

एका वृत्तानुसार, बेकेनहॅम काउंटी ग्राउंडचे मुख्य क्युरेटर जोश मार्डन यांनी खुलासा केला आहे की, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि संघ व्यवस्थापनाने अशी मागणी केली होती की आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करण्यासाठी आपल्याला चांगली खेळपट्टी हवी आहे. त्यांची थेट मागणी होती की चांगली खेळपट्टी खूप सपाट किंवा खूप हिरवी नसावी. तर पाच दिवसांत आमचा चांगला सराव होईल, अशी खेळपट्टी तयार करा.

जोश मार्डन यांनी सांगितले की, त्यांनी अशी खेळपट्टी मागितली आहे जी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी समान परिस्थिती निर्माण करू शकेल. त्यामुळे आम्हाला काही बदल करावे लागले, गवत कापावे लागले. त्यानंतर सपोर्ट स्टाफचे समाधान झाले.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ - 

कर्णधार : शुभमन गिलउपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंतफलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डीऑलराउंडर : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूरगोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादवविकेटकीपर : ध्रुव जुरेल

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-

पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्सदुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅमतिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडनचौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन

हे ही वाचा -

IND Vs ENG Test Series : इंग्लंड दौऱ्याआधी गिल-गंभीरकडून मोठी चूक? 'या' खेळाडूला संधी न दिल्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष निवडकर्त्यावर संतापले