Pakistani fast bowler waqar younis story : पाकिस्तान क्रिकेट संघाने (Team Pakistan) आजवर क्रिकेट जगताला अनेक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. यातील एक मोठं नाव म्हणजे वेगवान गोलंदाज वकार युनूसचे (waqar younis).आपल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे वकारचं नाव अव्वल गोलंदाजांमध्ये सामील आहे. वकारचा केवळ पाकिस्तानच्याच नव्हे तर जगातील स्टार वेगवान गोलंदाजांच्या यादीत समावेश होतो. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत वकार दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 789 विकेट्स घेतल्या आहेत. पण याच महान गोलंदाजाचं हाताचं एक बोटचं नसल्याचं फारजणांना माहित नसावं. त्याचं हे बोट गमावण्यामागेही एक कहानी आहे.
तर जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज वकार युनूसचं एक बोटच नाही. त्याच्या डाव्या हाताचं सर्वात लहान बोट नाही. पण यानंतरही त्याने गोलंदाजीत आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. वकार उजव्या हाताने गोलंदाजी करत असल्याने त्याच्या करिअरवर त्याच्या डाव्या हातच्या बोटाचा फारसा परिणाम झाला नाही.
नेमकं काय झालं होतं?
वकारने एकदा कालव्यात पोहण्यासाठी उडी घेत असताना त्याचा अपघात झाला. एकदा त्याने कालव्यात उडी घेतली त्यावेळी चूकीच्या पद्धतीने उडी घेतल्याने त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत इतकी मोठी होती की डॉक्टरांना त्याचं बोट कापावं लागलं. या अपघातातून सावरल्यानंतर देखील वकारनं शानदार पुनरागमन केलं होतं.
पाकिस्तानमध्ये निवड होण्यापूर्वी केवळ 6 प्रथम श्रेणी सामने खेळला
वकार युनूसने 1987/88 मध्ये विविध क्लबसाठी खेळून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने त्याच्यातील टॅलेंट ओळखलं आणि तो त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात घेऊन गेला. पाकिस्तानकडून खेळण्यापूर्वी वकारने केवळ 6 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. ऑक्टोबर 1989 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सध्या ऑस्ट्रेलियात असतो वकार
पाकिस्तानात जन्मलेला वकार युनूस सध्या आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात राहतो. वकार युनूसची पत्नी फरयाल युनूस ही मूळची पाकिस्तानी ऑस्ट्रेलियन आहे. यामुळे वकार त्तिच्यासोबत ऑस्ट्रेलियातील केलीविले येथे राहतो. त्यांची पत्नी फरयाल या व्यवसायाने डॉक्टर आहेत. वकारला एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन आपत्य आहेत. मुलींची नावे मायरा आणि मरियम आणि मुलाचं नाव अजान आहे.
हे देखील वाचा-