IND vs ENG Test : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडचं अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरलं. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित मानला जातोय. कारण, चौथ्या कसोटीत आराम करणारा जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतलाय. त्याशिवाय रजत पाटीदार याला बेंचवर बसवण्यात आलेय.
भारताची 11 -
यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
इंग्लंडच्या संघात मार्क वूड परतला -
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन सामन्यानंतर इंग्लंडने रणनिती बदलली. आता इंग्लंड संघ दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरत आहे. धर्मशाला कसोटी सामन्यात मार्क वूड आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजीची धूरा संभाळणार आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टले फिरकीची धुरा संभाळतील. त्यांच्या जोडीला जो रुट असेलच.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर
अश्विनचं खास शतक
भारताच्या आर. अश्विन आणि इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो यांच्यासाठी (Ravichandran Ashwin and Jonny Bairstow) खास असणार आहे. कारण हा कसोटी करिअरमधील त्यांचा 100 वा सामना असेल. हा सामना अविस्मर्णीय करण्यासाठी दोन्ही खेळाडू जिवाची बाजी लावतील. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.