Team India vs England 4th Test Match: एमएस धोनीच्या (MS Dhoni) रांची शहरात होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं (England 11 for the third Test vs India) आपल्या 11 शिलेदारांची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. लागोपाठ दोन कसोटीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्लंड संघाने रणनितीमध्ये बदल केल्याचं दिसतेय. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
इंग्लंडच्या संघात दोन बदल कोणते ?
वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि फिरकी गोलंदाज रेहान अहमद यांना इंग्लंड संघातून बाहेर बसवण्यात आलेय. तिसऱ्या कसोटीत बेंचवर असणाऱ्या ओली रॉबिन्सन आणि फिरकी गोलंदाज शोएब बशीर यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय.
ओली रॉबिन्सन भारतामध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. जेम्स अँडरसन याच्यासोबत नव्या चेंडूने तो गोलंदाजी करताना दिसेल. अँडरसनने तिसऱ्या कसोटी सामन्यात 38 षटके गोलंदाजी केली होती, पण त्याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले होते. पण अँडरसनचा अनुभव तगडा आहे, त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीतही संधी दिली आहे.
रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 - England 11 for the third Test vs India
जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.