England Playing XI Announced 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून लीड्समध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याआधीच इंग्लंडने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी जाहीर करून क्रिकेटप्रेमींना चकित केलं आहे. सामन्याच्या 48 तास आधीच प्लेइंग  XI जाहीर करणं हा इंग्लंडचा एक प्रकारचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

प्लेइंग इलेव्हनमधून तीन महत्त्वाचे खेळाडू वगळण्यात आले आहेत. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तर एका स्पेशालिस्ट स्पिनरला स्थान मिळाले आहे. इंग्लंडने जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कुक यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.

इंग्लंडची डोक्यात नक्की कोणती रणनीती? 

असे म्हटले जात होते की, लीड्स कसोटीत इंग्लंड संघाने हिरव्या खेळपट्टीऐवजी चांगल्या फलंदाजीच्या खेळपट्टीची मागणी केली आहे. परंतु इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहता तसे वाटत नाही. कारण इंग्लंडने आपल्या संघात 4 गोलंदाज ठेवले आहेत, त्यापैकी एक फिरकी गोलंदाज शोएब बशीर आहे. इंग्लंड एका फिरकी गोलंदाजासह मैदानावर उतरला आहे आणि तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, त्यांच्याकडे कर्णधार बेन स्टोक्स आहे. जो स्वतः एक मध्यमगती गोलंदाज आहे. याचा अर्थ इंग्लंड चार वेगवान गोलंदाजांसह येईल आणि हे एक संकेत आहे की लीड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.

जर आपण इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहिले तर, त्यात एक कमकुवत दुवा आहे आणि ज्याचा फायदा टीम इंडिया घेऊ शकते. इंग्लंडच्या गोलंदाजी युनिटमध्ये अनुभवाचा अभाव आहे. अँडरसन आणि ब्रॉड दोघेही भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत होते, परंतु आता ते दोघेही निवृत्त झाले आहेत.

आता इंग्लिश संघ ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर यांच्यावर अवलंबून आहे. इंग्लंड संघातील ख्रिस वोक्स हा एकमेव अनुभवी गोलंदाज आहे, ज्याने टीम इंडियाला अडचणीत आणले आहे आणि यावेळी तो इंग्लंडचा सर्वात मोठा स्ट्राईक बॉलर असेल. त्यामुळे भारतीय फलंदाज याचा फायदा घेऊ शकतात. आता लीड्स कसोटीत कोणाचा वरचष्मा आहे हे पाहायचे आहे.

पहिल्या कसोटी भारतविरुद्ध इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.

हे ही वाचा -

IND Vs ENG 1st Test : टीम इंडियाच्या प्रॅक्टिसदरम्यान 'हाय व्होल्टेज ड्रामा', कुलदीप-जडेजासह 4 खेळाडू कोचशी भिडले? VIDEO व्हायरल