ENG vs NZ: लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळं पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. फिल्डिंग करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला लॉर्ड्स कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं.त्याच्या जागेवर मॅट पार्किन्सनला संघात स्थान देण्यात आलं आहे. 


ईसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, "फिल्डिंग करताना डोक्याला दुखापत झाली आहे. जॅक लीक यांच्यात कन्कशनचे लक्षणं दिसत आहेत. कन्कशनच्या  गाईडलाईन्सनुसार, त्याला संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. न्यूझीलंडच्या डावातील सहाव्या षटकात स्टुअर्ड ब्रॉर्ड गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदजीवर डेव्हॉन कॉन्वेनं बॅकवर्ड पाईंटच्या दिशेनं फटका मारला. चेंडू सीमारेषेकडं जात असताना जॅक लीचनं ड्राईव्ह मारून चौकार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर थोडावेळ तो मैदानातच झोपूनच राहिला आणि उठल्यानंतर पव्हेलियनमध्ये परतला. 


ट्वीट-



न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: 
टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जेमिसन, टिम साउथी, एजाझ पटेल, ट्रेंट बोल्ट.


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: 
झॅक क्रॉली, अॅलेक्स लीस, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकिपर), मॅटी पॉट्स, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.




इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिकेतील वेळापत्रक
इंग्लंड न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 2- 6 जून दरम्यान खेळला जात आहे. सामना लॉर्डच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 10-14 जून दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 23- 27 जून दरम्यान खेळला जाणार आहे. 




हे देखील वाचा-